"संघाच्या लोकांना अर्ध्या चड्ड्या घालून फिरताना लाज कशी वाटत नाही?"

पाटणा : बिहार निवडणुकीत पराभूत झालेल्या भारतीय जनता पक्षावर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्या आणि लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांनी घणाघाती टीका केली आहे. 

Updated: Jan 18, 2016, 04:43 PM IST
"संघाच्या लोकांना अर्ध्या चड्ड्या घालून फिरताना लाज कशी वाटत नाही?" title=

पाटणा : बिहार निवडणुकीत पराभूत झालेल्या भारतीय जनता पक्षावर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्या आणि लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांनी घणाघाती टीका केली आहे. 

'भाजपवाले आम्हाला लाठी में तेल पिलावन पार्टी म्हणतात. पण त्यांना संघाच्या हाफ चड्ड्या कशा काय चालतात?' असा सवाल त्यांनी केला. 

"आमचे कार्यकर्ते सभेला लाठी घेऊन आले की भाजपवाले भडकतात. पण संघाच्या शिबीरांना जातारे लोक लाठ्या घेऊन जातात ते भाजपला कसं काय चालतं? संघाचे म्हातारे लोक सार्वजनिक ठिकाणी हाफ चड्ड्या घालून वावरतात, त्यांना लाज कशी वाटत नाही?", अशी जहरी टीका त्यांनी केली.

राष्ट्रीय जनता दलाच्या त्रेवार्षिक सभेला संबोधित करताना त्या बोलत होत्या.