फेसबुकवर खोट्या नावाने चॅटिंग करणारे निघाले पती-पत्नी

दोघेही फेसबुकवर एकमेकांना भेटले. सहा महिने त्यांची चॅटिंग सुरु होती. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले तेव्हा एकमेकांना भेटायचे ठरवले मात्र जेव्हा ते समोरासमोर आले तेव्हा दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसला. गेल्या सहा महिन्यांपासून चॅटिंग करणारे ते दोघं खऱ्या लाईफमध्ये चक्क पती-पत्नी होते. ही काही फिल्मस्टोरी नाहीये. उत्तर प्रदेशच्या बरैलीमध्ये घडलेली ही खरी घटना आहे. 

Updated: Feb 3, 2016, 08:44 AM IST
फेसबुकवर खोट्या नावाने चॅटिंग करणारे निघाले पती-पत्नी title=

लखनऊ : दोघेही फेसबुकवर एकमेकांना भेटले. सहा महिने त्यांची चॅटिंग सुरु होती. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले तेव्हा एकमेकांना भेटायचे ठरवले मात्र जेव्हा ते समोरासमोर आले तेव्हा दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसला. गेल्या सहा महिन्यांपासून चॅटिंग करणारे ते दोघं खऱ्या लाईफमध्ये चक्क पती-पत्नी होते. ही काही फिल्मस्टोरी नाहीये. उत्तर प्रदेशच्या बरैलीमध्ये घडलेली ही खरी घटना आहे. 

बरेलीच्या मणिनाथ निवासीने फेसबुकवर एका तरुणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्या तरुणीनेही ती रिक्वेस्ट स्वीकारली. दोघांमध्ये काही काळानंतर चॅटिंग सुरु झालं. सहा महिन्यांपासून ते दोघंही एकमेकांशी चॅट करत होते. हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात होत गेले. काही काळानंतर या दोघांनी एकमेकांना भेटायचे ठरवले. एका रेस्टॉरंटमध्ये या दोघांनी भेट घ्यायचे ठरवले. 

मात्र जेव्हा हे दोघेही समोरासमोर आले तेव्हा या दोघांना आश्चर्याचा मोठा धक्काच बसला. गेल्या सहा महिन्यांपासून जे एकमेकांशी चॅटिंग करत होते ते दोघेही खरे पती-पत्नीच होते. यानंतर हॉटेलमध्ये मोठा हंगामा झाला.