पती, पत्नी आणि ‘लिव्ह इन पार्टनर’ही राहणार एकाच घरात!

लोक न्यायालयानं दिलेल्या एका निर्णयाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. या निराळ्याच निर्णयामध्ये न्यायालयानं पती आणि पत्नीसोबत पतीच्या ‘लिव्ह इन पार्टनर’लाही एकाच घरात राहण्याची परवानगी दिलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 2, 2013, 11:34 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, खंडवा (मध्य प्रदेश)
लोक न्यायालयानं दिलेल्या एका निर्णयाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. या निराळ्याच निर्णयामध्ये न्यायालयानं पती आणि पत्नीसोबत पतीच्या ‘लिव्ह इन पार्टनर’लाही एकाच घरात राहण्याची परवानगी दिलीय.
लोक न्यायालयानं एका व्यक्तीला आदेश दिलेत, की तो बारी-बारीनं १५ दिवस आपल्या पत्नीसोबत आणि १५ दिवस आपल्या लिव्ह इन पार्टनरसोबत व्यतीत करेल. या व्यक्तीची पत्नी आणि त्याची लिव्ह इन पार्टनर एकाच घरात एकाच छपराखाली राहतात. लोक न्यायालयानं, ओंकारेश्वरमधल्या मांधाताचा निवासी बसंत माहूलाल त्याची पत्नी शांती आणि बसंतसोबत गेल्या दहा वर्षांपासून ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राहणाऱ्या राजमकुमारीला एकाच घरात राहण्याचा निर्णय दिलाय.
लोक न्यायालयानं वरिष्ठ न्यायालयाद्वारे दिलेल्या ‘लिव्ह इन रिलेशनशीप’ला मान्यता देण्याच्या दृष्टीने हा निर्णय दिलाय. यामुळे बसंतला आपल्या पार्टनरला घर आणि जमिनीमध्येही अर्धा हिस्सा द्यावा लागणार आहे.
महत्त्वाचं म्हणेज, न्यायालयानं निर्णय देताना बसंतला घराच्या मध्यभागी असलेल्या रुममध्ये राहण्यास सांगितलंय. त्याची पत्नी एका बाजुला असणाऱ्या एका रुममध्ये तर दुसऱ्या बाजुला असलेल्या रुममध्ये त्याची ‘ती’ राहील. पतीच्या घराचे दरवाजे दोन्हीही बाजुंनी उघडतील... तसंच पतीच्या घराचा दरवाजा दोन्ही बाजुंनी आळीपाळीनं १५-१५ दिवसांसाठी उघडेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.