पतीचे पैसे... बॉयफ्रेंडसोबत परदेशवारी; अशीही भारतीय नारी!

By Shubhangi Palve | Last Updated: Monday, November 25, 2013 - 18:54

www.24taas.com, झी मीडिया, लखनऊ
पतीचे पैसे बॉयफ्रेंडसोबत परदेशवारी करण्यात उडवणाऱ्या एका पत्नीचं फेसबुकमुळे पितळ उघडं पडलंय. लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यानंतच हे लग्न आता कोर्टात पोहचलंय.
लखनऊच्या गोमतीनगरमध्ये राहणाऱ्या एका माजी अधिकाऱ्याचा मुलगा समीर (बदललेलं नाव) इंग्लंडच्या बर्कशायरमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतो. समीरचं लग्न देहरादूनला राहणाऱ्या साक्षी (बदललेलं नाव) १३ एप्रिल २०१३ रोजी झालं. त्यानंतर मे महिन्यात पहिल्याच आठवड्यात समीर इंग्लंडला निघून गेला. साक्षीनं अभ्यासाचं कारण देऊन ‘मी नंतर येईन…’ असं त्याला सांगितलं. जूनच्या पहिल्या आठवड्यात साक्षी इंग्लंडला गेली. तिथे साक्षीनं मनजोगती शॉपिंग केली आणि मला भारतात परत जायचंय, असं समीरला सांगितलं. तिनं समीरच्या कार्डमधून पाऊंड काढले आणि तिथून निघाली.
एका महिन्यानंतर साक्षी इंग्लंडला पोहचली आणि पुन्हा १५ दिवसांनी अभ्यासासाठी ती तिथून निघाली. लग्नानंतर पाच महिन्यांत पाच आठवडेदेखील तिने समीरसोबत घालवले नाही. ऑक्टोबमध्ये समीरच्या एका मित्रानं साक्षीचे दुसऱ्या एका तरुणासोबत फोटो पाहिल्याचं समीरला सांगितलं. राहुलनं अधिक माहिती मिळवल्यानंतर, साक्षीनं आपल्या लग्नाआधीच्या नावानं फेसबुक प्रोफाइल बनवल्याचं समीरच्या लक्षात आलं. पण, या प्रोफाईलमध्ये ना समीरचा समावेश होता ना त्याच्या कोणत्या नाईवाईकांचा... पण, यामध्ये साक्षीचे दुसऱ्याच एका तरुणासोबत फोटो होते... आणि त्यावर तारखाही होत्या... या त्याच तारखा होत्या जेव्हा साक्षीनं अभ्यासासाठी भारतात जाण्याची थाप मारली होती.
समीरनं साक्षीच्या फ्लाईटची माहिती काढली, तेव्हा माहीत पडलं की ती भारतात गेलीच नव्हती... तर ती दुसऱ्याच देशांत दुसऱ्याच एका तरुणासोबत फिरत होती. समीरनं साक्षीचे चॅट, मेल आणि मॅसेजही तपासले. तेव्हा चंदीगडच्या सनीबद्दल (बदललेलं नाव) त्याला कळलं.
यानंतर समीरनं लगेचच लखनऊच्या फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी धाव घेतलीय. समीरच्या वडिलांनीही साक्षी असं काही करेल असं आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं, असं म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, November 25, 2013 - 18:54
comments powered by Disqus