पंतप्रधानपदासाठी मीच योग्य : आझम खान

समाजवादी पक्षाचे आझम खान यांनी पुन्हा एकदा बडबड केलेय. त्यांनी नरेंद्र मोदींपेक्षा आपणच देशात सध्या पंतप्रधानपदासाठी मी योग्य व्यक्ती असल्याचा दावा केलाय.

PTI | Updated: Dec 16, 2015, 11:04 AM IST
पंतप्रधानपदासाठी मीच योग्य : आझम खान title=

लखनऊ : समाजवादी पक्षाचे आझम खान यांनी पुन्हा एकदा बडबड केलेय. त्यांनी नरेंद्र मोदींपेक्षा आपणच देशात सध्या पंतप्रधानपदासाठी मी योग्य व्यक्ती असल्याचा दावा केलाय.

मोदी यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्व खासदार पंतप्रधानपदासाठी माझी निवड करतील, असे धक्कादायक वक्तव्य केलेय. पंतप्रधानपद मिळाल्यानंतर देशाला प्रगती पथावर घेऊन जात मी एक चांगला संदेश देईन, असे ते म्हणालेत. पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव माझ्या नावाला पाठिंबा देतील, असा दावाही केलाय.

लखनऊमध्ये आझम खान यांना उपमुख्यमंत्री बनविण्यासाठी पोस्टर्स लावण्यात आली आहेत. या पोस्टर्सवरून तुम्ही माझा या पदासाठी शिफारस करून अपमान करत आहात. माझी पंतप्रधान बनण्याची इच्छा आहे. या पदासाठी योग्य उमेदवार आहे. त्यामुळे  ही पोस्टर्स हटविण्यास सांगितल्याचे ते म्हणालेत.