श्रीकर परदेशींची पीएमओमध्ये उपसचिवपदी नियुक्ती

महाराष्ट्रासाठी एक अभिमानाची बातमी... राज्यातील कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळख असलेले आयएएस अधिकारी श्रीकर परदेशी यांची पीएमओमध्ये उपसचिवपदी नियुक्ती करण्यात आलीय. पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधाकामावर हातोडा चालवणारे परदेशी 'बुलडोजर मॅन' म्हणूनही ओळखले जातात.

Updated: Apr 1, 2015, 11:03 AM IST
श्रीकर परदेशींची पीएमओमध्ये उपसचिवपदी नियुक्ती title=

नवी दिल्ली : महाराष्ट्रासाठी एक अभिमानाची बातमी... राज्यातील कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळख असलेले आयएएस अधिकारी श्रीकर परदेशी यांची पीएमओमध्ये उपसचिवपदी नियुक्ती करण्यात आलीय. पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधाकामावर हातोडा चालवणारे परदेशी 'बुलडोजर मॅन' म्हणूनही ओळखले जातात.

पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती चार आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करणात आलीय. यात श्रीकर परदेशींसह गुलजार नटराजन, ब्रिजेश पांडे, मयुर माहेश्वरी यांचा समावेश आहे. गुलजार नटराजन यांच्याकडे पंतप्रधान कार्यालयाची संचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
 
श्रीकर परदेशी २००१च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील अनधिकृत बांधकामावर त्यांनी हातोडा चालवला होता. तसंच नांदेडमध्ये कॉपीमुक्त करण्याचा एक पॅटर्न त्यांनी राबवला होता. पीएमओमध्ये त्यांचा कार्यकाळ चार वर्षांचा असेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.