... तर पाकिस्तानचे १६ तुकडे

By Prashant Jadhav | Last Updated: Friday, April 21, 2017 - 17:54
... तर पाकिस्तानचे १६ तुकडे

नवी दिल्ली :  भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने सोडले नाही तर त्यांचे १६ तुकडे करायला हवेत, असे भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.

एका कार्यक्रमात बोलताना स्वामी म्हणाले, 'पाकिस्तानचे आताच दोन तुकडे झाले आहेत. फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी केली तर चार तुकडे होतील. पाकिस्तानने त्यानंतरही आपली चूक मान्य केली नाही तर 16 तुकडे करायला हवेत.'

'राम मंदिर उभारण्याबाबत फक्त सर्वोच्च न्यायालयाकडून येणाऱया निकालाची वाट पाहत आहोत. या वर्षी आम्ही राम मंदिर उभारूनच दाखवू. राम मंदिर उभारण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही,' असेही स्वामी म्हणाले.

First Published: Friday, April 21, 2017 - 17:54
comments powered by Disqus