बाबा रामपाल अटक, पण आश्रमात ६० नाशिककर अडकले

अखेर स्वयंघोषित बाबा रामपालला अटक झालीय. पण हरियाणातील हिस्सार इथल्या बरवालानगर इथं बाबा रामपाल यांच्या आश्रमात दर्शनासाठी गेलेले पंचवटी, सिडकोसह नाशिक जिल्ह्यातील ६० नागरिक अडकलेले आहेत. दोन दिवसांपासून ते आश्रमातच अन्न पाण्यापासून होते, असं वृत्त आहे. बाबा रामपाल यांच्या अटकेनंतर गुरुवारी त्यांची चौकशीनंतर सुटका होण्याची शक्यता आहे.

Updated: Nov 20, 2014, 08:31 AM IST
बाबा रामपाल अटक, पण आश्रमात ६० नाशिककर अडकले title=

हिस्सार : अखेर स्वयंघोषित बाबा रामपालला अटक झालीय. पण हरियाणातील हिस्सार इथल्या बरवालानगर इथं बाबा रामपाल यांच्या आश्रमात दर्शनासाठी गेलेले पंचवटी, सिडकोसह नाशिक जिल्ह्यातील ६० नागरिक अडकलेले आहेत. दोन दिवसांपासून ते आश्रमातच अन्न पाण्यापासून होते, असं वृत्त आहे. बाबा रामपाल यांच्या अटकेनंतर गुरुवारी त्यांची चौकशीनंतर सुटका होण्याची शक्यता आहे.

आश्रमाबाहेर हिंसाचार सुरू झाल्यानंतर पोलीस आश्रमातून निघणाऱ्या बाबा रामपाल समर्थकांवर लाठीमार करीत होते, त्यामुळं नाशिकमधील त्यांच्या नातेवाईकांवर जीव मुठीत धरून जगण्याची वेळ आली होती. ४ नोव्हेंबरपासून आश्रमात असलेल्या नाशिकमधील भाविकांना एखादी चपाती खाऊन भूक भागवावी लागत आहे. या भाविकांनी महाराष्ट्र शासनाकडून मदत मागितली आहे. 

आश्रमात मंगळवारपर्यंत सुमारे दीड लाखाहून अधिक भाविक होते. बुधवारपर्यंत केवळ ४० हजार शिल्लक राहिले असून, त्यांना आश्रमातून बाहेर यायचे आहे, मात्र बाहेर आल्यावर पोलिसांच्या लाठीमाराला सामोरं जावं लागत असल्यानं अनेक जण आश्रमातच आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.