भारत आणि रशिया यांच्यात मैत्रीचं नवं पर्व

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौ-याचा दुसरा दिवस थोडा खास राहिला.. कारण भारत आणि रशिया या दोन मित्र राष्ट्रांत मैत्रीचं नवं पर्व सुरु झालंय.. भारत आणि रशिया यांच्यातली 16 वी वार्षिक परिषद पार पडली.. 

Updated: Dec 25, 2015, 10:24 AM IST
भारत आणि रशिया यांच्यात मैत्रीचं नवं पर्व  title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौ-याचा दुसरा दिवस थोडा खास राहिला.. कारण भारत आणि रशिया या दोन मित्र राष्ट्रांत मैत्रीचं नवं पर्व सुरु झालंय.. भारत आणि रशिया यांच्यातली 16 वी वार्षिक परिषद पार पडली.. 

यावेळी दोन्ही देशांत विविध 16 करारांवर स्वाक्ष-या झाल्या.. परिषदेनंतर पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांनी पत्रकार परिषद घेऊन या करारांची माहिती दिली... 

भारत-रशिया करारावर स्वाक्ष-या झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी फ्रेंड्स ऑफ इंडिया या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.. यावेळी रशियन कलाकारांनी नृत्याच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवलं. 

माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी यांच्या कवितेवर आधारित नृत्यही या कलाकारांनी सादर केलं त्याला मोदींचीही दाद मिळाली. याच कार्यक्रमात रशियन कलाकारांनी सादर केलेल्या गरबा नृत्यानं मोदींचं मन जिंकलं.