फायलिनला भारताने हरवलं

By Jaywant Patil | Last Updated: Sunday, October 13, 2013 - 13:16

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
फायलिनला भारताने हरवलं आहे. शनिवारी ओडिशा आणि आंध्रच्या किनारपट्टीवर धडकलेल्या फायलिन चक्रीवादळाचा वेग मंदावलाय. गोपालपूरमध्ये वारे आता ताशी 90 ते 100 किमी वेगाने वारे वाहत आहेत.
आता हे वादळ झारखंडमध्ये दाखल झालंय. झारखंडमध्ये सोसाट्याचा वारा वाहत असून मुसळधार पाऊस सुरु आहे. उद्या हे वादळ उत्तर प्रदेशात धडकण्याची शक्यता आहे.. सहा राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आलाय. दरम्यान ओडिशा आणि आंध्रच्या किनारपट्टी परिसराला फायलिनचा तडाखा बसलाय. या भागात वादळाने नुकसान केल्याचं सांगण्यात येतंय. फायलिन वादळामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून वृक्ष उन्मळून पडले आहेत. फायलिनच्या पार्श्वभूमीवर ८ लाख नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय.
या वादळात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं एनडीआरएफनं म्हटलंय. शनिवारी आंध्र आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर हे वादळ धडकलं. वादळाच्या पार्श्वभूमीवर जवळपास ८ लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं होतं. या वादळाचा परिणाम वाहतूक सेवेवरही झाला. हावडा आणि विशाखापट्टणमच्या दरम्यान रेल्वे गाड्या बंद आहेत, तर अनेक उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. मात्र आता फायलिनचा वेग मंदावलाय.
फायलीन वादळामुळे ओरिसात पाच जणांचा बळी गेलाय. ओरिसातल्या गोपालपूरला फायलीनचा सर्वाधिक धोका आहे. तिथे तुफान पाऊस सुरू आहे. त्यामुळे झालेल्या भूस्खलनामुळे तिघांचा मृत्यू झालाय. दरम्यान यामुळे ४ लाख ४६ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. ५६ ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तर १८ ट्रेनचे मार्ग बदललेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी लष्काराचीही मदत घेतली जातेय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, October 13, 2013 - 13:16
comments powered by Disqus