`बोईंग सी-१७`चा भारतीय हवाईदलात समावेश!

सी-१७ या सर्वात मोठ्या लढाऊ विमानाचा आज भारतीय हवाई दलात समावेश केला जाणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 2, 2013, 12:13 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
`बोईंग सी-१७` या सर्वात मोठ्या लढाऊ विमानाचा आज भारतीय हवाई दलात समावेश केला जाणार आहे.
हिंडन इथल्या हवाई दलावर संरक्षणमंत्री ए. के. अॅन्टोनी यांच्या हस्ते या विमानाचा हवाईदलात समावेश करण्याचा कार्यक्रम होईल. भारताने अमेरिकेकडून या विमानाची खरेदी केलीय. ८० टन सामग्री म्हणजेच एक टँक किंवा तीन मोठ्या तोफा किंवा १५० जवानांना वाहून नेण्याची क्षमता या महाकाय विमानाची आहे. कठीण परिस्थितही ८०० किमीची अफाट वेग हे या विमानाचं वैशिष्ट्य आहे.. रशियन बनावटीच्या आय १-७६ या विमानाच्या जागी आता `बोईंग सी-१७` या विमानाचा वापर केला जाणार आहे.

भारताने अमेरिकेकडे अशा दहा विमानांची मागणी केलीय. यापूर्वी भारताने जगातील सर्वात उंच हवाईपट्टी दौलत बेग ओल्डीवर सुपर हार्क्युलस एअरक्राफ्ट उतरुउन जगाचं लक्ष वेधलं होतं.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.