सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे देणार लष्कर, पंतप्रधान घेणार निर्णय

भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे भारतातून काही नेत्यांकडून मागितल्या गेल्यामुळे यावर वाद सुरु झाला आहे. पीओकेमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ जारी करण्यासाठी भारतीय लष्कर तयार झालं आहे. पण याचा अंतिम निर्णय पंतप्रधान घेणार आहेत.

Updated: Oct 5, 2016, 10:21 AM IST
सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे देणार लष्कर, पंतप्रधान घेणार निर्णय title=

नवी दिल्ली : भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे भारतातून काही नेत्यांकडून मागितल्या गेल्यामुळे यावर वाद सुरु झाला आहे. पीओकेमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ जारी करण्यासाठी भारतीय लष्कर तयार झालं आहे. पण याचा अंतिम निर्णय पंतप्रधान घेणार आहेत.

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार लष्कर हे त्यांनी केलेल्या कारवाईचा व्हिडिओ जारी करण्यासाठी तयार आहेत. सर्जिकल स्ट्राईकनंतर यावर पाकिस्तानने असं काही झालंच नसल्याचं म्हटलं होतं त्यानंतर भारतातही काही लोकांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

भारतीय सेनेच्या अधिकाऱ्यांच्या मते हा व्हिडिओ भारतासमोर ठेवून द्या ज्यामुळे ज्यांना ही सर्जिकल स्ट्राईकवर शंका आहे त्यांना उत्तर मिळून जाईल. उरी हल्ल्यानंतर भारताने पीओकेमधील दहशतवाद्यांचे काही ठिकाणं उद्धवस्त केले होते. 

काँग्रेस नेते संजय निरूपम, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्जिकल स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. लष्काराच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की त्यांच्याकडे सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे आहेत. व्हिडिओ शिवाय त्यांच्याकडे काही फोटो सुद्धा आहेत जे जवानांनी या कारवाई दरम्यान शूट केले होते.