‘मंगळयान’चे पाच हिरो!

मार्स ऑर्बिटर मिशन भारतासाठी सगळ्यात मोठं यश आहे... या मिशनमुळं चीन आणि जपानला मागं टाकत भारतानं नवी भरारी घेतलीय... या यशामागे देशाच्या पाच हिरोंचा सिंहाचा वाटा आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Nov 6, 2013, 08:11 AM IST

www.24taas.com , वृत्तसंस्था, श्रीहरीकोटा
मार्स ऑर्बिटर मिशन भारतासाठी सगळ्यात मोठं यश आहे... या मिशनमुळं चीन आणि जपानला मागं टाकत भारतानं नवी भरारी घेतलीय... या यशामागे देशाच्या पाच हिरोंचा सिंहाचा वाटा आहे.
भारतानं यशस्वीरीत्या मंगळाच्या दिशेने एक पाऊल पुढं टाकलंय... या ऐतिहासिक क्षणामुळं तमाम भारतीयांची छाती अभिमानानं फुलून गेली.. या भीमपराक्रमामुळं भारताला जगातल्या निव़डक देशांच्या पंक्तीत स्थान मिळालंय... ज्यांनी मंगळाच्या दिशेनं पाऊल टाकलंय... कोट्यवधी देशवासियांचं स्वप्न आणि आणि वैज्ञानिकांची मेहनत हे भारताच्या या ऐतिहासिक कामगिरी मागचं रहस्य आहे. अहोरात्र मेहनतीमुळं इस्त्रोच्या वैज्ञानिकांनी हे शक्य करुन दाखवलंय.
कोण आहेच मिशन मंगळचे ५ हिरो... या मिशनचे पहिले हिरो आहेत डॉ. शिवकुमार इस्त्रोचे सॅटेलाइट सेंटरचे संचालक... मार्स ऑर्बिटरची जबाबादारी शिवकुमार यांच्या देखरेखीखाली पार पडली...
या मिशनचे दुसरे हिरो आहेत डॉ. राम कृष्णन... विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालक असलेल्या रामकृष्ण यांच्या खांद्यावर मिशनसाठी लॉन्च वेहिकल तयार करण्याची जबाबदारी होती... ती त्यांनी समर्थपणे निभावली...
या मिशनचे तिसरे हिरो एम.ए.एस प्रसाद... स्पेस पोर्ट ऑफ इंडियाचे संचालक असलेल्या प्रसाद यांनी या मिशनमध्ये मोलाचं योगदान दिलं....
मिशनचे चौथे हिरो ठरले ते म्हणजे भारताच्या क्रायोजेनिक इंजिन तयार करण्यात योगदान देणारे डॉ. दत्तन...
या मिशनचे पाच हिरो ठरले ते मार्स मिशनचे संचालक उन्नीकृष्णन... या मिशनच्या महत्वाच्या व्यक्तीपैंकी उन्नीकृष्णन हे एक होते... मार्स मिशनच्या तयारीपासून ते लाँचपर्यंत पावला पावलावर उन्नीकृष्णन यांचं मार्गदर्शन इतर वैज्ञानिकांसाठी प्रेरणादायी ठरलं.
इस्त्रोच्या ३०० पेक्षा अधिक वैज्ञानिकांची मेहनत आणि स्वप्नांमुळं मार्स ऑर्बिटर मिशन साकार होऊ शकलंय... हे स्वप्न इस्त्रोनं साकार केलं चेअरमन डॉ. के.राधाकृष्णन यांच्या नेतृत्वात.... साऱ्या देशाची मान मिशन मार्सच्या यशामुळं उंचावलीय... या मिशनसाठी या सुपुत्रांना सारा देश सलाम करतोय....

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.