१५ राण्या, १०० नोकरांसह एक राजा दिल्लीत डेरेदाखल

भारत-ऑफ्रिका शिखर संमेलनात भाग घेण्यासाठी स्वित्झर्लंडचा राजा मस्वाती तिसरे देखील सामिल झाले आहेत. राजा मस्वाती तिसरे आपल्या १५ राण्या, ३० मुलं आणि शंभर नोकरांसह दिल्लीत डेरेदाखल आहेत. आपल्या एवढ्या ताफ्यासह मस्वाती यांनी दिल्लीतील हॉटेलात मुक्काम ठोकलाय.

Updated: Oct 31, 2015, 10:41 AM IST
१५ राण्या, १०० नोकरांसह एक राजा दिल्लीत डेरेदाखल title=

नवी दिल्ली : भारत-ऑफ्रिका शिखर संमेलनात भाग घेण्यासाठी स्वित्झर्लंडचा राजा मस्वाती तिसरे देखील सामिल झाले आहेत. राजा मस्वाती तिसरे आपल्या १५ राण्या, ३० मुलं आणि शंभर नोकरांसह दिल्लीत डेरेदाखल आहेत. आपल्या एवढ्या ताफ्यासह मस्वाती यांनी दिल्लीतील हॉटेलात मुक्काम ठोकलाय.

शिखर संमेलनात ५४ देशांनी भाग घेतला आहे, हे संमेलन गुरूवारी सुरू होणार आहे. मस्वाती तिसरे यांनी दिल्लीतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये २०० रूम्स बुक केल्या आहेत. 

या आधी १२५ राण्यांचा रेकॉर्ड
हा देश 1968 साली स्वतंत्र झाला होता, आपल्या, मस्वाती यांचे वडिल सोभुजा दुसरे यांना १२५ राण्या होत्या, मस्वाती यांना रंगेल राजाही म्हटलं जातं, त्यांच्या १५ राण्यांपैकी २ राण्यांना रॉयल दर्जा देण्यात आलंय.

मस्वाती हा राजा श्रीमंताच्या यादीतही आहे, २००९ साली फोर्ब्सने जी यादी प्रकाशित केली होती, त्यात २०० मिलियन डॉलर्सची संपत्ती होती. तेव्हा मस्वाती पंधराव्या स्थानावर आहे. मस्वाती यांनी २०१३ साली १८ वर्षाच्या मुलीशी पंधरावं लग्न केलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.