रेल्वे प्रवासात घेता येणार २५ प्रकारच्या चहाचा आस्वाद

नवी दिल्ली :  रेल्वेने प्रवास करताना चहाचा आस्वाद घेणे हा आपल्यापैकी अनेकांचा आवडता टाईमपास.

Updated: Feb 10, 2016, 11:34 AM IST
 रेल्वे प्रवासात घेता येणार २५ प्रकारच्या चहाचा आस्वाद title=

नवी दिल्ली :  रेल्वेने प्रवास करताना चहाचा आस्वाद घेणे हा आपल्यापैकी अनेकांचा आवडता टाईमपास. कागदी कपात मिळणारा चहा काही ठिकाणी मातीपासून तयार केलेल्या कुल्लडमध्येही मिळतो. आता २५ प्रकारच्या चहाचा आस्वाद घेता येणार आहे.

'आयआरसीटीसी'ने 'चायोस' नावाच्या एका कंपनीशी यासंबंधीचा करार केला आहे. ही कंपनी रेल्वे प्रवाशांना कुल्लड चाय, मिरची फ्लेवर चहा, आल्याचा चहा, जिंजर-हनी चाय आदी चहाचे प्रकार उपलब्ध करुन देणार आहे.

पहिल्या टप्प्यात ही सेवा दिल्लीहून सुटणाऱ्या गाड्यांमध्ये सुरू केली जाईल. 'चायोस'चे दिल्ली परिसरात सध्या २० कॅफे आहेत. पुढच्या टप्प्यात मुंबईतून सुटणाऱ्या गाड्यांमध्ये चहाची सेवा दिली जाईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने या सेवेचा देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर विस्तार केला जाईल.

आपली रेल्वे सुटण्याच्या दोन तास अगोदर ग्राहकांना आपली ऑर्डर ऑनलाईन किंवा रेल्वेने दिलेल्या टोल-फ्री क्रमांकावर (१८००-१०३४-१३९)
नोंदवावी लागेल. त्यांनी दिलेल्या ऑर्डरप्रमाणे त्यांचा आवडता चहा प्रवाशांच्या रेल्वेतील आसनावर मिळणार आहे. यासाठी 'आयआरसीटीसी'ने एक मोबाईल अॅपही तयार केले आहे.