आयआरसीटीसी घेऊन आलं व्हेकेशन टूर पॅकेज

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन अर्थात आयआरसीटीसीनं  ग्राहकांच्या पसंतीनुसार खास टुर प्लान करण्याची योजना सुरू केलीय. 

Updated: Mar 28, 2017, 08:14 PM IST
आयआरसीटीसी घेऊन आलं व्हेकेशन टूर पॅकेज  title=

मुंबई : इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन अर्थात आयआरसीटीसीनं  ग्राहकांच्या पसंतीनुसार खास टुर प्लान करण्याची योजना सुरू केलीय. त्यानुसार कधी, कुठं जायचं, तिथं काय खायचं आणि प्यायचं, कुठं आणि कसं फिरायचं, याचं प्लानिंग आयआरसीटीसी करून देणार आहे.

त्याशिवाय आपल्या खिशाचा विचार करून आयआरसीटीसीनं काही समर पॅकेज टुरही तयार केल्यायत. इतर ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या तुलनेत परवडणा-या दरात या टूर उपलब्ध आहेत. या टूर पॅकेजना ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो.

2014-15 मध्ये या माध्यमातून 200 कोटींची तर 2015-16 मध्ये 225 कोटींची कमाई आयआरसीटीसीनं केली आहे. 2016-17 मध्ये हा आकडा 250 कोटींवर जाण्याची शक्यता आहे.

रेल्वेनं यंदा प्रथमच ग्राहकांच्या पसंतीनुसार टूर प्लान करण्याची योजना आणलीय. ही योजना यशस्वी झाली तर रेल्वे पर्यटकांची संख्या आणखी वाढेल, एवढं नक्की...