जीसॅट-6 या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

 भारताचा अत्याधुनिक संवाद उपग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जीसॅट-6चे आज यशस्वी प्रक्षेपण झाले. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून संध्याकाळी 4.52 मिनिटांनी या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले.

PTI | Updated: Aug 27, 2015, 06:34 PM IST
जीसॅट-6 या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण title=

श्रीहरीकोटा भारताचा अत्याधुनिक संवाद उपग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जीसॅट-6चे आज यशस्वी प्रक्षेपण झाले. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून संध्याकाळी 4.52 मिनिटांनी या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले.

जीसॅट-6 हा इस्रोनं तयार केलेला 25 वा भूस्थिर संवाद उपग्रह आहे. जीसॅट सीरिजमध्ये त्याचा क्रम बारावा आहे. या उपग्रहाचे आयुर्मान नऊ वर्षे एवढे असून, त्याचे वजन 2117 किलोग्रॅम एवढं आहे. या उपग्रहामध्येच 6 मीटर व्यासाचा एस-बॅंड अनफर्लेबल अँटेना बसविण्यात आलाय.

आतापर्यंतचा हा सर्वांत मोठा अँटेना असल्याची माहिती इस्रोनं दिलीय. भूस्थिर उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी इस्रो तिसऱ्यांदा स्वदेशी बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनाचा वापर केलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.