दिल्लीत जैश-ए-मोहम्मदचे १२ संशयित दहशतवादी अटक

जैश-ए-मोहम्मदच्या १२ संशयित दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून  स्फोटके बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

Updated: May 4, 2016, 11:02 AM IST
दिल्लीत जैश-ए-मोहम्मदचे १२ संशयित दहशतवादी अटक title=

नवी दिल्ली : जैश-ए-मोहम्मदच्या १२ संशयित दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून  स्फोटके बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

दिल्लीच्या बाहेर तसेच उत्तर आणि पश्चिम दिल्लीत पोलिसांच्या विशेष पथकाने अनेक ठिकाणी छापा मारला. मंगळवारी रात्रीपासून पोलिसांनी हा छापेमारी सुरु केली होती. त्यानंतर अटकेची ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्यांपैकी ८ जणांना दिल्ली तर चौघांना उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आलेय.
 
पोलिसांनी पकडलेल्या संशयितांकडून स्फोटके बनवण्याचे साहित्य जप्त केलेय. या तरुणांची चौकशी सुरु आहे. या संशयितांकडून शहरातील महत्वाच्या ठिकाणी हल्ला करण्याची योजना आखली जात होती असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. 

उत्तरप्रदेशात छापेमारी करण्यासाठी पाच तर दिल्लीत सात पथकं तयार करण्यात आली होती. सध्या दिल्ली पोलीस विशेष पथकाची १२ जणांची टीम राजधानीत वेगवेगळ्या ठिकाणी छाड टाकत आहेत. अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्यांना उत्तरप्रदेशातील शहारनपूर आणि दिल्लीतील इंद्रपूरी परिसरातून ताब्यात घेण्यात आलेय.