मुस्लीम आहे सांगितलं म्हणून वाचला त्याचा जीव!

जम्मूमध्ये क्रूर दहशतवादी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी कसं थैमान घातलं याच्या हादरवून टाकणाऱ्या कथाच आता समोर येत आहेत. या दहशतवाद्यांनी एका दुकानदाराला केवळ तो मुस्लिम आहे असं त्यानं सांगितलं म्हणून सोडून दिलं.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 27, 2013, 05:25 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, जम्मू
जम्मूमध्ये क्रूर दहशतवादी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी कसं थैमान घातलं याच्या हादरवून टाकणाऱ्या कथाच आता समोर येत आहेत. या दहशतवाद्यांनी एका दुकानदाराला केवळ तो मुस्लिम आहे असं त्यानं सांगितलं म्हणून सोडून दिलं.
एका इंग्रजी दैनिकानं दिलेल्या बातमीनुसार, सोहनलाल वर्मा यानं दहशतवाद्यांना आपलं नाव सलीम खान आहे असं खोटंच सांगितलं. पण, यामुळे त्याचा जीव वाचला. तो मुस्लिम आहे असं समजून दहशतवाद्यांनी त्याला ‘अल्लाह का बंदा’ म्हणून सोडून दिलं.
‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा
हीरानगर पोलीस स्टेशनच्या समोर सोहन वर्मा याची कंफेक्शनरी शॉप आहे. ‘मी माझ्या दुकानाबाहेरच उभा होतो. तेव्हा ऑटोमधून तीन लोक खाली उतरले. ते पाकिस्तान जिंदाबाद आणि इस्लाम जिंदाबादच्या घोषणा देत होते. खाली उतरल्यानंतर त्यांनी जागीच ऑटो ड्रायव्हरला गोळ्या घातल्या. त्यातील दोघं पोलीस स्टेशनमध्ये घुसले आणि तीसरा अंदाधुंद फायरिंग करत होता. थोड्या वेळानं तोही आतमध्ये निघून गेला. ऑटो ड्रायव्हर जखमी अवस्थेत रोडवर पडला होता. मी त्याची मदत करण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच एका दहशतवाद्यानं मला पाहिलं आणि तो माझ्याजवळ आला’... हे सांगताना सोहनचा थरकाप उडतो.
‘त्यानं मला माझं नाव विचारलं. मी माझं नाव सलीम खान सांगितलं. तर त्यानं कुठला आहेस म्हणून विचारलं. मी डोडाहून आहे, असं त्याला सांगतिलं तर त्या दहशतवाद्यानं ‘तू अल्लाहका बंदा है हम तेरे को छोड कर जा रहे है’ असं म्हणत तो पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये निघून गेला’.

याचा भागात राहणाऱ्या प्रवीणच्या म्हणण्यानुसार दहशतवादी एक तास उशीरा आले असते तर मृतांची संख्या वाढली असती. कारण सकाळी या भागातील कॉलेज सकाळी ८.०० वाजता सुरू होतं त्यामुळे सकाळी ७.३० पासूनच हा रोड विद्यार्थ्यांनी भरलेला असतो.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.