जनता दल कर्नाटकात विरोधी पक्ष

कर्नाटकात दुसऱ्या स्थानावर जनता दल सेक्युलर (जेडीएस) पक्षाने मुसंडी मारत भाजपलाही मागे टाकले आहे. भाजपला जनतेने सत्तेतून खाली खेचताना त्यांना विरोधी पक्षाचाही दर्जा दिलेला नाही. मात्र, जनता दलाने जोरदार मुसंडी मारत विरोधी पक्षपद पटकावलेय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 8, 2013, 04:22 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, बंगळुरू
कर्नाटकात दुसऱ्या स्थानावर जनता दल सेक्युलर (जेडीएस) पक्षाने मुसंडी मारत भाजपलाही मागे टाकले आहे. भाजपला जनतेने सत्तेतून खाली खेचताना त्यांना विरोधी पक्षाचाही दर्जा दिलेला नाही. मात्र, जनता दलाने जोरदार मुसंडी मारत विरोधी पक्षपद पटकावलेय.
जेडीएसने ४२ जागांवर आघाडी मिळविली. तर भाजपला अवघ्या ३९ जागांवर आघाडी आहे. येडियुरप्पा यांच्या कर्नाटक जनता पक्षाला (केजेपी) १२ जागांवर आघाडी मिळाली आहे. मात्र, काँग्रेसने आघाडी घेऊन आपल्याकडे सत्तेच्या चाव्या खेचून आणल्या असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. या चाव्या मिळण्यासाठी भाजपपासून फारकत घेतलेले येडियुरप्पा यांची मदत झाल्याचे स्पष्ट झालेय. भाजप तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेलाय.
कर्नाटकात आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरवात झाली होती. सकाळी साडेदहाच्या दरम्यान कर्नाटकमधील पहिला विजय नोंदविला गेला. पुत्तुर मतदारसंघातून काँग्रेसच्या शकुंतला शेट्टी यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला. तर बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे संभाजी पाटील हे दक्षिण बेळगावमधून विजयी झाले आहेत. भाजपचे अभय पाटील यांचा संभाजी पाटील यांनी पराभव केला.महाराष्ट्र एकिकरण समितीला पहिले यश मिळाले आहे.

२००८ मध्ये दक्षिणेतील राज्यात पहिल्यांदा सत्ता स्थापन करू शकलेला भाजपला यावेळी मात्र, सत्ता टिकवण्यात अपयश आले. सरकार स्थापनेसाठी २२४जागांच्या विधानसभेत बहुमतासाठी ११३ जागांची आवश्यआकता होती. काँग्रेसने आतापर्यंत मिळालेल्या आघाड्यांनुसार ११६ जागा मिळविल्या आहेत. तर, दुसऱ्या स्थानावर जनता दल सेक्युलर (जेडीएस) पक्षाने मुसंडी मारत भाजपलाही मागे टाकले आहे. त्यांनी ४२ जागांवर आघाडी मिळविलेली आहे. तर भाजपला अवघ्या ३५जागांवर आघाडी आहे. येडियुरप्पा यांच्या कर्नाटक जनता पक्षाला (केजेपी) १२जागांवर आघाडी मिळाली आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.