जशोदाबेन यांना चारधाम यात्रेचा मुहूर्त मिळाला

नरेंद्र मोदींच्या पत्नी जशोदाबेन या 28 किंवा 29 एप्रिल रोजी हरीद्वारला जाणार आहेत.

Updated: Apr 20, 2014, 03:38 PM IST

www.24taas.com, झी मीडिया
नरेंद्र मोदींच्या पत्नी जशोदाबेन या 28 किंवा 29 एप्रिल रोजी हरीद्वारला जाणार आहेत. उत्तरी हरीद्वारच्या कच्छी आश्राम आणि शांतीकुंज इथे यात्रेकरुंना थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 1 मे रोजी चारधाम यात्रासाठी जशोदाबेन एका गटातून निघणार आहेत.
निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात नरेंद्र मोदींनी जशोदाबेन या आपल्या पत्नी असल्याचे सांगितले. तेव्हापासून जशोदाबेन या प्रसिद्धीच्या झोतात आहेत. जशोदाबेन या तिर्थ यात्रेला जाणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती. यातच आता जशोदाबेन यात्रेसाठी उत्तराखंडमध्ये जाणार आहेत. उत्तराखंडमध्ये मे महिन्यात चारधाम यात्रा सुरू होणार आहे.
हरीद्वारमध्ये एका गटासोबत जशोदाबेन जाणार आहेत. तिथे या गटासोबतच त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जशोदाबेनसोबत गटात 110 लोकं आहेत. ही संख्या जास्त असल्याने जशोदाबेन यांची राहण्याची व्यवस्था कच्छी आश्रम आणि शांतीकुंज येथे करण्यात आली आहे.
28 किंवा 29 एप्रिल रोजी जशोदाबेन उत्तराखंडमध्ये जाणार आणि 1 मे पासून त्यांची चारधाम यात्रा सुरू होणार असे सांगण्यात येत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.