अभिनेत्री जयाप्रदा भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छूक

अभिनेत्री जयाप्रदा भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छूक आहेत. जयाप्रदा यांची यापूर्वी समाजवादी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे . जयाप्रदा यांची भाजप नेत्यांबरोबर आपली बोलणी सुरू आहे, तसेच आपण भाजपमध्ये एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सामील व्हायचंय, असं जयाप्रदा यांनी म्हटलंय.

Updated: Jan 30, 2015, 10:34 PM IST
अभिनेत्री जयाप्रदा भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छूक title=

नवी दिल्ली : अभिनेत्री जयाप्रदा भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छूक आहेत. जयाप्रदा यांची यापूर्वी समाजवादी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे . जयाप्रदा यांची भाजप नेत्यांबरोबर आपली बोलणी सुरू आहे, तसेच आपण भाजपमध्ये एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सामील व्हायचंय, असं जयाप्रदा यांनी म्हटलंय.

भाजपसाठी काम करण्याची इच्छा असून यामागे कोणत्याही प्रकारच्या पदाचे किंवा निवडणूक लढविण्याचे स्वार्थ नसल्याचे जयाप्रदा यांनी म्हटले आहे. याआधी दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात जयाप्रदा भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढविणार असल्याची चर्चा होती. यावर बोलत असताना त्या म्हणाल्या की, 'मी असे कधीही म्हटलेले नाही. 

मी केवळ भाजपमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतरची सर्व माध्यमांनीच हवा तयार केली आहे. मला तिकीट दिले जावे याबद्दल कोणतीही चर्चा केलेली नाही.' 

देशात प्रबळ राजकीय स्थिती असणे महत्त्वाचे आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आपली इच्छा आहे, असे जयाप्रदा म्हणाल्या. याआधी एन.टी.रामाराव, चंद्रबाबू आणि मुलायम सिंह यादव यांच्या नेतृत्त्वाखाली काम केले असून समाजवादी पक्षाचा दहा वर्षांचा अनुभव गाठीशी असल्याचेही त्या म्हणाल्या. 

समाजवादी पक्षात काम करत असताना रामपूर येथे मुलींना इंग्रजी आणि संगणकाचे ज्ञान दिले जाण्याची इच्छा व्यक्त केली असता मुलायम सिंह यांनी विरोध दर्शवत मुलींना संगणकाच्या ज्ञानाची गरज नसल्याचे कारण दिले होते. 

पाश्चिमात्य देशांशी स्पर्धा करत असताना अशी वृत्ती बाळगून चालणार नाही. याउलट देशाला पुढे नेण्यासाठी नरेंद्र मोदी करत असलेले प्रयत्न आणि नेतृत्वाने मी भारावून गेले. म्हणून माझे विचार भाजप पक्षाच्या विचारसरणीशी समरुप असल्याचे मला वाटते, असंही जयाप्रदा यांनी स्पष्ट केलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.