VIDEO : निवडणुकीसाठी बाशिंग; बारबालांसोबत 'पोल डान्स'ची मस्ती!

बिहार विधानसभा निवडणूक तोंडावर आलीय. याच दरम्यान सत्ताधाऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या जनता दलाचा एक उमेदवार अभय कुशवाहा यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय. 

Updated: Oct 1, 2015, 11:03 AM IST
VIDEO : निवडणुकीसाठी बाशिंग; बारबालांसोबत 'पोल डान्स'ची मस्ती!  title=

गया : बिहार विधानसभा निवडणूक तोंडावर आलीय. याच दरम्यान सत्ताधाऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या जनता दलाचा एक उमेदवार अभय कुशवाहा यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय. 

या व्हिडिओत कुशवाहा बारबालासोंबत 'पोल डान्स' करताना दिसत आहेत. इतकंच नाही तर ते बारबालांवर पैशांचा पाऊसही पाडताना दिसत आहेत. हा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर पक्षाकडून मात्र कोणताच खुलासा करण्यात आलेला नाही. 

व्हिडिओ पाहा :-  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.