पंतप्रधानांचा फोटो वापरल्यामुळे 'जिओ'ला 500 रुपयांचा दंड

पंतप्रधान कार्यालयाकडून परवानगी न घेता जाहिरातींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो वापरल्यामुळे रिलायन्स जिओला 500 रुपयांचा दंड लावण्यात आला आहे.

Updated: Dec 3, 2016, 04:39 PM IST
पंतप्रधानांचा फोटो वापरल्यामुळे 'जिओ'ला 500 रुपयांचा दंड  title=

नवी दिल्ली : पंतप्रधान कार्यालयाकडून परवानगी न घेता जाहिरातींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो वापरल्यामुळे रिलायन्स जिओला 500 रुपयांचा दंड लावण्यात आला आहे. टाईम्स ऑफ इंडियानं हे वृत्त दिलं आहे.

समाजवादी पक्षाचे खासदार नीरज शेखर यांनी राज्यसभेमध्ये जिओच्या या जाहिरातीबाबत प्रश्न विचारला होता. तेव्हा माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी हे उत्तर दिलं. तेव्हा जिओविरोधात कोणती कारवाई करण्यात येणार असं शेखर यांनी विचारलं असता कारवाई करण्याचा कायदा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाच्या अखत्यारीत असल्याचं राठोड यांनी सांगितलं.