जम्मू-काश्मीर, झारखंडमध्ये भाजपचा मतांचा टक्का वाढला!

जम्मू काश्मीर आणि झारखंड या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झालेत.

Updated: Dec 23, 2014, 09:22 PM IST
जम्मू-काश्मीर, झारखंडमध्ये भाजपचा मतांचा टक्का वाढला! title=

जम्मू - काश्मीर 
भाजप - २५ 
काँग्रेस -  १५
जेकेएनसी – १०
पीडीपी – ३१
इतर – ६

झारखंड 
भाजप – ३९  
काँग्रेस – ४  
झारखंड मुक्ती मोर्चा – २२
झारखंड विकास मोर्चा – ८
इतर – ८

उल्लेखनीय विजय - पराभव... 
* जम्मू-काश्मीर, हंदवाडा मतदारसंघातून सज्जाद लोन यांचा विजय
* जम्मू-काश्मीर, अमीरा कदममधून हिना बट्ट यांचा पराभव
* जम्मू-काश्मीरच्या अनंतनागहून पीडीपीचे उमेदवारी मुफ्ती मोहम्मद सईद यांचा विजय
* जम्मू-काश्मीरच्या सोनावारमधून राज्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा पराभव
* झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांचा मझगावमध्ये पराभव
* झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन बरटेटहून विजयी

 

सकाळी ११.३० वाजता
* झारखंडमध्ये भाजपची एकहाती सत्ता निश्चित
* जम्मू-काश्मीरमध्ये भाजपला ऐतिहासिक यश 
* भाजपसोबत जाण्यास पीडीपी, अब्दुल्ला इच्छुक
* भाजप पीडीपीला सोबत घेण्याची शक्यता
* माझगावमधून मधू कोडा पराभूत
* मधू कोडा झारखंडचे माजी मुख्यमंत्री 
* मुख्यमंत्री हेमंत सोरेनही पिछाडीवर

सकाळी १०.१५ वाजता
* काश्मीर-झारखंडमध्ये मोदींची जादू चालली
* भाजप संसदीय बोर्डाच्या बैठकीत मिठाई वाटली 
* जम्मू-काश्मीरमध्ये भाजप ठरला सर्वात मोठा पक्ष
* जम्मू-काश्मीरमध्ये भाजपला ऐतिहासिक यश
* बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आघाडीची गरज 
* दोन्ही राज्यांत भाजपचंच सरकारन बनणार
* केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांची प्रतिक्रिया

सकाळी १०.१५ वाजता
काश्मीरमध्ये मोदींची जादू चालली
जम्मू-काश्मीरमध्ये भाजप ठरतोय सर्वात मोठा पक्ष

सकाळी ९.३० वाजता
* काश्मीर विधानसभा त्रिशंकू राहण्याची शक्यता
* मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला सोनावरमधून पिछाडीवर
* पीडीपी-भाजपमध्ये रस्सीखेच
* अनंतनागमधून पीडीपीचे मुफ्ती मोहम्मद सईद आघाडीवर
* पीपल्स कॉन्फरन्सचे सज्जाद लोन आघाडीवर 

जम्मू - काश्मीर ८० जागांचे कल हाती... 
भाजप - २८ जागांवर आघाडीवर
काँग्रेस -  ६
जेकेएनसी – १३ 
पीडीपी – २९
इतर – ४

झारखंडमध्ये भाजपनं गाठला बहुमताचा आकडा... ७८ जागांचा कल हाती 
भाजप – ४६ जागांवर आघाडीवर
काँग्रेस – ६  
झारखंड मुक्ती मोर्चा – १७ 
झारखंड विकास मोर्चा – ११  
इतर – ५

सकाळी ८.२० वाजता
जम्मू-काश्मीरमध्ये सात जागांचे कल हाती
तीन जागांवर भाजप आघाडीवर
तीन जागांवर पीडीपी आघाडीवर
तर एका जागेवर काँग्रेस आघाडीवर

झारखंडमध्ये सहा जागांचे कल हाती... 
४ जागांवर भाजप आघाडीवर
एका जागेवर झारखंड मुक्ती मोर्चाची आघाडी
तर एका जागेवर इतर

 

नवी दिल्ली : जम्मू काश्मीर आणि झारखंड या दोन राज्यांचं भवितव्य आज स्पष्ट होईल. या दोन राज्यात आज मतमोजणी होतेय. 

दोन्ही राज्यात पाच टप्प्यात मतदान झालं. जम्मू काश्मीरमध्ये या वेळी विक्रमी मतदान झालं आहे. ही सत्ताधारी ‘नॅशनल कॉन्फरन्स’साठी धोक्याची बाब आहे. सकाळी ८ वाजल्यापासून जम्मू काश्मीरमध्ये मतमोजणी सुरू झालीय. सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी मिळून २८ मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आली आहे. 

मतदानाच्या पाच टप्प्यांच्या काळात जम्मू काश्मीरमध्ये चारवेळा दहशतवाद्यांनी हल्ले केले. हे सर्व हल्ले सुरक्षा दलांनी हाणून पाडले. मतमोजणीलाही कोणतीही घातपाती कारवाई यावेळी होऊ नये म्हणून सुरक्षा दलांनी कडक बंदोबस्त ठेवलाय. 

तर झारखंडमध्येही मतमोजणीला सुरुवात झालीय. झारखंडमध्ये भाजपच्या पारड्यात सर्वच जनमत चाचण्याची कौल दाखवला आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन, माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा, मधू कोडा याचं भवितव्य आज ठरणार आहे. 

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २००८ 
भाजप - ११ जागा
काँग्रेस - १७ जागा
जेकेएनसी – २८ जागा
पीडीपी – २१ जागा
इतर – १० जागा 

झारखंड विधानसभा निवडणूक २००९ 
भाजप – २३ जागा 
काँग्रेस – २१ जागा 
झारखंड मुक्ती मोर्चा – १८ जागा 
झारखंड विकास मोर्चा – ११ जागा 
इतर – ८ जागा 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.