माजी केंद्रीय मंत्र्याने घेतलं 16 लाखाचं भाड्याचं घर

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल आता महिन्याला 16 लाख रूपयाच्या भाड्याच्या घरात राहणार आहेत. 

Updated: Jun 24, 2014, 08:25 PM IST
माजी केंद्रीय मंत्र्याने घेतलं 16 लाखाचं भाड्याचं घर title=

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल आता महिन्याला 16 लाख रूपयाच्या भाड्याच्या घरात राहणार आहेत. 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील जोरबाग भागात 1250 स्वे.फू. एवढ्या आकाराचा बंगला आहे. हा बंगला व्यावसायिक सिद्धार्थ सरीन यांचा आहे, त्यांनी सुरूवातीला 18 लाख रुपये एवढे भाडे सांगितले होते. 

मात्र, 16 लाख रुपयांवर तो ठरविण्यात आला आहे. सिब्बल हे वकील व्यवसाय आणि राहण्यासाठी या बंगल्याचा वापर करणार आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. 

दरम्यान, एक ऑगस्ट पूर्वी सिब्बल सरकारी बंगला खाली करणार आहेत. यूपीए सरकारमधील 265 खासदारांना या महिना अखेर पर्यंत बंगले खाली करण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे हे मंत्री विविध ठिकाणी राहण्यासाठी जागा शोधत आहेत. 

शहरातील लुटियंस जोन भागात राहण्यासाठी विविध नेत्यांची पसंती आहे. या भागापासून राष्ट्रपती भवन, पंतप्रधानांचे कार्यालय आणि सरकारी कार्यालये फारच जवळ आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.