..तर कर्नाटकची मग्रुरी मोडून काढू - रावते, अजित पवारही सरसावले

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यास कर्नाटक सरकारची मग्रुरी मोडून काढू, असं वक्तव्य दिवाकर रावते यांनी केले. कानडी पोलिसांनी पत्रकार परिषद नाकारली होती. त्यानंतर त्यांनी हा इशारा दिला. 

Updated: Aug 1, 2014, 05:02 PM IST
..तर कर्नाटकची मग्रुरी मोडून काढू - रावते, अजित पवारही सरसावले title=

बेळगाव, मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यास कर्नाटक सरकारची मग्रुरी मोडून काढू, असं वक्तव्य दिवाकर रावते यांनी केले. कानडी पोलिसांनी पत्रकार परिषद नाकारली होती. त्यानंतर त्यांनी हा इशारा दिला.  

दरम्यान, सुप्रीम कोर्टानेही मारहाणीची दखल घेतली. त्याचवेळी येळ्ळूर प्रकरणावरून महाराष्ट्र सरकार नरेंद्र मोदींची भेट घेणार आहे. कर्नाटक महाराष्ट्र  सीमावर्ती भागातला वादग्रस्त प्रदेश केंद्रशासीत करावा अशी मागणी राज्य सरकार करणार  आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीय. 

सीमाप्रश्नी मराठी भाषिकांची भेट घेण्यासाठी बेळगावमध्ये गेलेल्या शिवसैनिकांना पत्रकार  परिषद घेण्यास पोलिसांनी मनाई केलीय. शिवसेना नेते दिवाकर रावते याठिकाणी  पत्रकार परिषद घेणार होते. मात्र पोलिसांनी त्यास नकार दिलाय. शिवसेनेचं शिष्टमंडळ  आज बेळगावमध्ये आलंय. पोलिसांनी आम्हाला पकडण्यासाठी आमच्या मागून गाडी पळविली. इतकी त्यांनी गाडी पळविली की, त्यांच्या गाडीला अपघात झाला, असे रावते यांनी सांगितले.

या शिष्टमंडळामध्ये हातकणंगल्याचे आमदार डॉ. सुजित  मिनचेकर, जिल्हाध्यक्ष विजय देवणे, सांगली जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांचा  समावेश आहे. दरम्यान आम्हाला बोलण्यात गुंतवून अटक करण्याचा आयजींचा डाव  होता. कर्नाटक पोलिसांनी आमचा भीषण पाठलाग केला असा आरोप दिवाकर रावते  यांनी केलाय. उद्धवजींनी आदेश दिला तर प्रत्येक शिवसैनिक कन्नडिगांची ही मग्रुरी  मोडून काढेल असा इशाराही त्यांनी दिलाय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.