प्रक्षोभक भाषण प्रकरणी आबांवर बेळगावात गुन्हा, karnataka govt. book case against r.r.patil

प्रक्षोभक भाषण प्रकरणी आबांवर बेळगावात गुन्हा

प्रक्षोभक भाषण प्रकरणी आबांवर बेळगावात गुन्हा
www.24taas.com, बेळगाव

प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर बेळगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण ठाकूर यांच्या सत्कार समारंभात केलेल्या भाषणाप्रकरणी हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

गेल्या रविवारी किरण ठाकूर यांच्या ६१ निमित्त बेळगावात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील उपस्थित होते. यावेळी सीमा भागातील मराठी भाषकांना एकी करण्याचे आवाहन आर. आर. पाटील यांनी केले होते. या आवाहनामुळे या ठिकाणी प्रभाव पडू शकतो, असे कर्नाटक सरकारला वाटले. त्यामुळे त्यांनी प्रक्षोभक भाषणाचा गुन्हा आबांविरोधात दाखल केला आहे.

या घटनेचे सीमा भागात पडसाद पडत असून लोकशाहीत आपल्या हक्काबद्दल बोलण्याचाही अधिकार मराठी माणसाला नाही, अशा प्रतिक्रिया उमटत आहे. महाराष्ट्रातील काही नेते मंडळी सीमावर्ती भागातील जनतेला सांगतात की कर्नाटकाशी सामंज्यस्याने वागा. पण कर्नाटक सरकार महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला बक्षत नाही तर सामान्यांना काय दाद देणार अशीही प्रतिक्रिया उमटत असल्याचे झी २४ तासचे प्रतिनिधी राजन भोसले यांनी माहिती दिली.

First Published: Wednesday, April 10, 2013, 15:39


comments powered by Disqus