कर्नाटकात भाजपचे पानिपत, काँग्रेसची बाजी

कर्नाटक राज्याची सूत्रे कोणाच्या हाती जाणार याचा फैसला आज होत आहे. मात्र, काँग्रेसने आघाडी घेऊन आपल्याकडे सत्तेच्या चाव्या खेचून आणल्या असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. या चाव्या मिळण्यासाठी भाजपपासून फारकत घेतलेले येडियुरप्पा यांची मदत झाल्याचे स्पष्ट झालेय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 8, 2013, 04:22 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, बंगळुरू
कर्नाटक राज्याची सूत्रे कोणाच्या हाती जाणार याचा फैसला आज होत आहे. मात्र, काँग्रेसने आघाडी घेऊन आपल्याकडे सत्तेच्या चाव्या खेचून आणल्या असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. या चाव्या मिळण्यासाठी भाजपपासून फारकत घेतलेले येडियुरप्पा मदत झाल्याचे स्पष्ट झालेय. भाजप तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेलाय. तर येडियुरप्पांनी बाजी मारत विरोधी पक्षाची भूमिका बजवण्याचे सूत्र हाती घेतल्याचे निकालावरून स्पष्ट होत आहे.
लोकसभेच्या तोंडावर काँग्रेस आणि भाजप या राष्ट्रीय पक्षांच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती. मात्र, काँग्रेसने भाजपला जोदरात धक्का देत सत्तेतून खाली खेचल्याचे दिसत आहे. काँग्रेसने स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे.
कर्नाटकमध्येी विधानसभा निवडणुकीच्याउ मतमोजणीला सुरुवात झाली त्यावेळी काँग्रेसने आघाडी घेतली होती. सुरुवातीचे कौल हाती आले असून सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला फटका बसल्याचे चित्र आहे. भाजप सध्या ३९जागांवर आघाडीवर असून कॉंग्रेस १११ जागांवर पुढे आहे. माजी मुख्य मंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्या केजीपीला १४ ठिकाणी आघडी आहे. स्वतः येडियुरप्पा यांना शिकारपुरा मतदारसंघातून आघाडी मिळाली आहे.

भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मात्र येडियुरप्पांचा फटका बसलेला दिसत आहे. परंतु, त्यांच्याच पक्षाला जास्त जागांवर आघाडी नाही. जेडीएसला ४२ ठिकाणी आघाडी आहे. जेडीएसने अनपेक्षितरित्याय आघाडी घेतली आहे. अर्थात हा भाजपलाच बसलेला फटका आहे. जेडीएस राज्यात दुसरा मोठा पक्ष म्हाणून समोर येण्याचची शक्यहता आहे.
बेळगाव आणि सीमेलगतच्या मराठी भाषिक भागात महाराष्ट्रीय एकीकरण समितीने संभाजी पाटील, किणीकर, अरविंद पाटील असे तीन उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे बेळगाव मराठी राज असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. भाजपने मराठी माणसाची साथ सोडल्याने बेळगावमध्येही त्यांना फटका बसलाय.
पक्षीय बलाबल
काँग्रेस -११६, भाजप -३७, जेडीएस - ४१, केजेपी १२, अन्य - १७

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.