गैरव्यवहाराचा आरोप असलेले कार्ती चिदंबरम लंडनला रवाना

आर्थिक गैरव्यवहारचा आरोप असलेले कार्ती चिदंबरम काल रात्री लंडनला रवाना झालेत. दोन दिवसांपूर्वीच सीबीआयने त्यांच्या घरांवर धाडी घातल्या होत्या.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 19, 2017, 09:27 AM IST
गैरव्यवहाराचा आरोप असलेले कार्ती चिदंबरम लंडनला रवाना

नवी दिल्ली : आर्थिक गैरव्यवहारचा आरोप असलेले कार्ती चिदंबरम काल रात्री लंडनला रवाना झालेत. दोन दिवसांपूर्वीच सीबीआयने त्यांच्या घरांवर धाडी घातल्या होत्या.

आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपात अडकलेले ललित मोदी आणि कर्ज बुडवल्या प्रकरणी वादात असलेल्या विजय मल्लांच्या सोबतीला आणखी एक बडी असामी जोडली जाण्याची यामुळे शक्यता व्यक्त होत आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वीच सीबीआयनं ज्यांच्या घरांवर धाडी घातल्या, ते कार्ती चिदंबरम लंडनला रवाना झालेत.  

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी मात्र कार्ती पूर्वनियोजित कामासाठी लंडनाला गेले असून ते लवकरच परत येतील, असं स्पष्टीकरण दिले आहे. मात्र मल्ल्या आणि ललित मोदींचा अनुभव बघता, कार्तींही परत येणार की नाही, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.