शौचालय बांधा, बलात्कार टाळा- जयराम रमेश

By Jaywant Patil | Last Updated: Sunday, January 13, 2013 - 15:58

www.24taas.com, रायपूर
दिल्लीमध्ये गँगरेप झाल्यापासून देशभरात अशा प्रकारच्या बलात्कारांची वेगवेगळी कारणं शोधण्याची शर्यतच लागली आहे. त्यातही अशा बलात्कारांची अतार्किक कारणमीमांसा करण्यात येत आहे. सरसंघचालक मोहन भागवत, आसाराम बापू, अबू आझमी, हरीश रावत यांपाठोपाठ जयराम रमेश यांनीही बलात्कारांमगे नवं कारण शोधलं आहे.
केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी शनिवारी रायपूर येथे बलात्करांमागच्या कारणांबद्दल मत मांजताना त्यांचा संबंध थेट शौचालयांशी लावला आहे. ग्रामीण भारतातजोपर्यंत घरोघरी शौचालयं बांधली जात नाहीत, तोपर्यंत बलात्कारासारख्या घटना कमी होणार नाहीत, असं रमेश म्हणाले.
जयराम रमेश यापुढे म्हणाले, “ग्रामीण भारतात माळरानावर किंवा शेतांमध्ये स्त्रियांना शौचास जावे लागते. त्यामुळे बलात्कारांसारखे प्रकार घडतात. मात्र अशी प्रकरणं दाबली जातात. जर प्रत्येक घरात शौचालयं बांधली, तर महिलांना शौचासाठी घराबाहेर जावं लागणार नाही, आणि बलात्कारांचं प्रमाण कमी होतील.”

घरोघरी शौचालयं असावीत, हे मान्य केलं तरी या कारणामुळे बलात्कार होतात, हे विधान तितकंसं तर्कसंगत नाही. मात्र जयराम रमेश यांनी यापूर्वीही अनेकदा अशा प्रकारची वादग्रस्त विधानं केली आहेत.

First Published: Sunday, January 13, 2013 - 15:58
comments powered by Disqus