केजरीवाल यांची पलटी, लालूच गळ्यात पडलेत

बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्यात राजद  प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या गळाभेटीवरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अखेर मौन सोडलेय. या भेटीनंतर त्यांना टीकेचा सामना करावा लागला होता. लालूच माझ्या गळ्यात पडलेत, असे केजरीवाल म्हणालेत.

PTI | Updated: Nov 23, 2015, 02:05 PM IST
केजरीवाल यांची पलटी, लालूच गळ्यात पडलेत title=

नवी दिल्ली : बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्यात राजद  प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या गळाभेटीवरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अखेर मौन सोडलेय. या भेटीनंतर त्यांना टीकेचा सामना करावा लागला होता. लालूच माझ्या गळ्यात पडलेत, असे केजरीवाल म्हणालेत.

अधिक वाचा :  सोशल मीडियावर लालू-केजरीवाल गळाभेटीची खिल्ली

मी नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी गेलो होतो. लालूंशी हस्तांदोलन केल्यानंतर त्यांनी स्वत: मला मिठी मारली. मी अजूनही लालूंच्या भ्रष्टाराविरोधात आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

लालू प्रसाद यादव यांची गळाभेट घेतल्याने केजरीवाल यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या स्वप्नांचा विश्वासघात केला, अशी टीका विरोधकांनी तसेच काही आपमधील स्वकीयांनीही केली होती. यावर आज केजरीवाल यांनी हा खुलासा केलाय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.