<B> चारा खाणाऱ्या ‘माळ्या’ला मिळणार १४ रुपये रोज! </b>

चारा खाऊन थकलेल्या बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांना रांचीतील बिरसा मुंडा तुरुंगात बागकाम करण्याची संधी मिळालीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 5, 2013, 02:28 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, रांची
चारा खाऊन थकलेल्या बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांना रांचीतील बिरसा मुंडा तुरुंगात बागकाम करण्याची संधी मिळालीय.
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव हे सध्या मुंडा तुरुंगात आहेत. हजारो कोटींच्या चारा घोटाळाप्रकरणी लालूप्रसादांना पाच वर्षांची शिक्षा झालीय. याच लालूंना तुरुंगात आता माळी म्हणून बागकाम करावं लागणार आहे. बिरसा मुंडा तुरुंगाच्या ५२ एकर परिसरात लॉन्स, बगीचे आणि भाजीपाल्याचे मळे यांची देखभाल करावी लागणार आहे... आणि मुख्य म्हणजे यासाठी लालूंना पगारही मिळणार आहे. बगिच्याच्या देखभालीसाठी लालूंना १४ रुपये रोजही मिळणार आहे.

पाच वर्षांच्या शिक्षा सुनावणीनंतर लालूंनी झारखंड उच्च न्यायालयात जामीनासाठी केलेला अर्ज फेटाळून लावण्यात आलाय. तसंच याच प्रकरणात लालूंबरोबर दोषी ठरलेल्या एक आयआरएस आणि तीन आयएएस अधिकाऱ्यांना तुरूंगातील कैद्यांना शिकवण्याची म्हणजेच शिक्षकाची जबाबदारी देण्यात आली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.