हिवाळी अधिवेशनाचे शेवटचे 2 दिवस, आजही गोंधळाची शक्यता

संसदेच्या हिवाळी अधिवेशन संपायला 2 दिवस बाकी आहेत. 16 नोव्हेंबरपासून सुरु झालेलं हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरला संपणार आहे. पण नोटबंदीच्या विरोधामुळे एक दिवसही अधिवेशन सुरळीत चाललं नाही.

Updated: Dec 15, 2016, 09:19 AM IST
हिवाळी अधिवेशनाचे शेवटचे 2 दिवस, आजही गोंधळाची शक्यता title=

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशन संपायला 2 दिवस बाकी आहेत. 16 नोव्हेंबरपासून सुरु झालेलं हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरला संपणार आहे. पण नोटबंदीच्या विरोधामुळे एक दिवसही अधिवेशन सुरळीत चाललं नाही.

पंतप्रधान मोदींनी नोटबंदीच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात सर्व विरोधी पक्ष एकवटले. रस्त्यापासून ते संसेदपर्यंत त्यांनी याविरोधात निदर्शने केली. 

नोटबंदीच्या मुद्द्यावर आज देखील संसदेत गोंधळाची शक्यता आहे. काँग्रेस आणि भाजपने आपल्या खासदारांना व्हिप जारी करुन संसदेत उपस्थित राहण्यास सांगितलं आहे. संसदेचं सत्र सुरु झाल्यापासूनच विरोधत नोटबंदीच्या मुद्यावर पंतप्रधानांनी बोलावं अशी मागणी करत आहे. सरकारपुढे 2 दिवसात अनेक बिलं पास करण्याचं आव्हान आहे.