दिल्लीत मराठी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज

 रेल्वेअॅप्रेंटीस च्या मुलांना रेल्वेत समावून घेण्यासाठी आंदोलन करणा-या मराठी मुला- मुलींवर दिल्लीतील रेल्वे मंत्रालयासमोर लाठीचार्ज झाला. यात महाराष्ट्रातील अनेक मुले जखमी झाली आहेत. मराठी मंत्री म्हणून सुरेश प्रभू यांच्याकडे हे विद्यार्थी आले असता त्यांना काठ्या खाव्या लागल्या आहेत. महाराष्ट्रातील दीड हजार मुलानी आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यानंतर या सर्व मुला मुलींना संसद मार्ग पोलिस ठाण्यात डांबण्यात आले. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 31, 2017, 09:19 PM IST
दिल्लीत मराठी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज title=

नवी दिल्ली :  रेल्वेअॅप्रेंटीस च्या मुलांना रेल्वेत समावून घेण्यासाठी आंदोलन करणा-या मराठी मुला- मुलींवर दिल्लीतील रेल्वे मंत्रालयासमोर लाठीचार्ज झाला. यात महाराष्ट्रातील अनेक मुले जखमी झाली आहेत. मराठी मंत्री म्हणून सुरेश प्रभू यांच्याकडे हे विद्यार्थी आले असता त्यांना काठ्या खाव्या लागल्या आहेत. महाराष्ट्रातील दीड हजार मुलानी आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यानंतर या सर्व मुला मुलींना संसद मार्ग पोलिस ठाण्यात डांबण्यात आले. 

उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात आणि मोदींच मतदारसंघ वाराणसी येथील मुलांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. यापुढे रेल रोको करण्यात येणार असल्याचेही मुलांनी सांगितले. 

काय झालं दिल्लीत.... 

- दिल्लीत मराठी मुला मुलींवर लाठीचार्ज
- दीड हजार मराठी मुलांना बेदम मारहाण
- रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या कार्यालयासमोर निदर्शन
- सुरेश प्रभू मुळे मराठी मुलांना काठ्यांचा मार
- देशभरातून १० हजार मुलांनी केले निदर्शन
- शांततेत निदर्शन करणा-या मुला मुलींवर लाठीचार्ज
- अॅपरेन्टीस केलेल्यांना रेल्वे सेवेत समावून घेण्याची मागणी