१०० कोटींपेक्षा कमी खर्चाचे टोलनाके रद्द करणार, गडकरींची घोषणा

देशात १०० कोटींपेक्षा कमी खर्च असलेले टोलनाके बंद करणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत केली आहेत. यामुळं देशातील ६२ टोलनाके बंद होणार आहेत, यात राज्यातील १२ टोलनाक्यांचा समावेश असेल. 

Updated: Mar 16, 2015, 03:17 PM IST
१०० कोटींपेक्षा कमी खर्चाचे टोलनाके रद्द करणार, गडकरींची घोषणा title=

नवी दिल्ली: देशात १०० कोटींपेक्षा कमी खर्च असलेले टोलनाके बंद करणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत केली आहेत. यामुळं देशातील ६२ टोलनाके बंद होणार आहेत, यात राज्यातील १२ टोलनाक्यांचा समावेश असेल. 

तसंच आतापर्यंत महाराष्ट्रासह देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरील ६५ टोलनाके रद्द केले असल्याचं नितीन गडकरी यांनी सांगितलं. तसंच देशात ३९० पैकी १८० ठिकाणी ई-टोलची सुविधा सुरू झाल्याचीही माहिती नितीन गडकरींनी राज्यसभेत दिली.

देशात आणि विशेषत: महाराष्ट्रात नेहमीच टोलविरोधी आंदोलनं होत असतात. अन्यायकारक टोलवसुलीमुळं लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं टोलविरुद्ध घेतलेली ही भूमिका सामान्यांच्या किती फायद्याची ठरेल हा येणारा काळच सांगेन

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.