जम्मू-काश्मीरमध्ये 'भाजपा' आणि 'पीडीपी'ची 'युती'

जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदा भाजपा आणि पीडीपीचं सरकार स्थापन करण्यात आलं आहे. मुफ्ती मोहम्मद सईद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ७९ मुफ्ती मोहम्मद सईद यांच्यासह २४ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला.

Updated: Mar 1, 2015, 11:30 PM IST
जम्मू-काश्मीरमध्ये 'भाजपा' आणि 'पीडीपी'ची 'युती' title=

जम्मू  : जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदा भाजपा आणि पीडीपीचं सरकार स्थापन करण्यात आलं आहे. मुफ्ती मोहम्मद सईद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ७९ मुफ्ती मोहम्मद सईद यांच्यासह २४ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला.

शपथविधी समारंभात नरेंद्र मोदी, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, भाजपा अध्यक्ष अमित शाह आणि सरचिटणीस राम माधव यांची उपस्थिती होती, नॅशनल कॉन्फरन्सने शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकला. भाजपाला पहिल्यांदा जम्मू-काश्मिरमध्ये सत्तेत सहभाग मिळाला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.