गर्मीतून वाचण्यासाठी घेतलं कोल्ड ड्रिंक आणि जीव धोक्यात

उन्हाळ्याच्या दिवसांत गर्मीपासून वाचण्यासाठी किंवा घशाची कोरड थांबवण्यासाठी जर तुम्ही कोल्ड ड्रिंक घेत असाल तर सावधान... कारण कोल्ड ड्रिंक पिणंही कदाचित तुम्हाला महागात पडू शकतं.

Updated: Apr 19, 2016, 04:07 PM IST
गर्मीतून वाचण्यासाठी घेतलं कोल्ड ड्रिंक आणि जीव धोक्यात title=

आग्रा : उन्हाळ्याच्या दिवसांत गर्मीपासून वाचण्यासाठी किंवा घशाची कोरड थांबवण्यासाठी जर तुम्ही कोल्ड ड्रिंक घेत असाल तर सावधान... कारण कोल्ड ड्रिंक पिणंही कदाचित तुम्हाला महागात पडू शकतं.

कारण, अशीच एक घटना नुकतीच आग्र्यात उघडकीस आलीय. या घटनेत एका मुलीने कोल्ड ड्रिंकचं सेवन केल्यानंतर तिला विषबाधा झाली आणि हॉस्पिटलमध्ये भरती कराव लागलंय.

काय घडलं नेमकं...
आग्रामध्ये राहणाऱ्या अंकिता चौधरीने गर्मीपासून वाचण्यासाठी तिने दुकानातून 'स्लाइस'ची बाटली घेतली आणि प्यायला सुरुवात केली. थोड्या वेळानंतर तिला उलट्या होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे ती घाबरली. त्या अवस्थेत तीची नजर स्लाइसच्या बाटलीकडे गेली तेव्हा तिला चक्क बाटलीत पाल आढळली.

हे पाहून तिला जबरदस्त धक्काच बसला. थोड्याच वेळात तिची प्रकृती गंभीर झाली. त्यामुळे, जवळच्या हॉस्पिटलमध्ये तिला हलवण्यात आलं.

अंकिताच्या नातेवाईकांनी यासंदर्भात 'स्लाईस' प्रशासनाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला परंतु, त्यांनी मात्र या प्रकरणातून हात वर केले. धक्कादायक म्हणजे, यानंतर नातेवाईकांनी पोलीस स्टेशन गाठून याबद्दल तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला परंतु, पोलिसांनीही याची तक्रार नोंदवली नाही.