राहुल गांधी X नरेंद्र मोदी सामना, विरोधकांना धूळ चारू - राहुल

By Surendra Gangan | Last Updated: Tuesday, October 8, 2013 - 14:17

www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या विरोधकांना २०१४ मध्येही धूळ चारू असा निर्धार काँग्रेसचे उपाध्य़क्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, येत्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी - नरेंद्र मोदी सामना होण्याचे संकेत दोन्ही पक्षांकडून देण्यात आले आहेत.
भाजपने इंडिया शायनिंगचे कॅम्पेन चालवले, इंडिया तर चमकला मात्र विरोधक हरले असा टोलाही त्यांनी लगावला. वटहुकुमाबाबत बोलण्याची वेळ चुकली असं आपल्याला गुजरातमधील पत्रकारांनी विचारलं होतं, मात्र सत्य बोलण्यासाठी वेळ निवडावी लागत नसल्याचंही राहुल यांनी सांगितलं.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत राहुल गांधीच आमचे नेते आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री पी चिदम्बरम यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केलं आहे. काँग्रेसकडून पहिल्यांदाच एखाद्या मोठ्या नेत्यानं राहुल गांधींच्या पंतप्रधानपदाविषयी अधिकृत भूमिका मांडली आहे. त्यामुळं २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार राहुल गांधीच असल्याचं स्पष्ट झालं आहे.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींची अधिकृत घोषणा केल्यानंतरही काँग्रेसनं मात्र अशी कुठलीही अधिकृत भूमिका घेतलेली नव्हती. मात्र राहुल गांधींची उपाध्यक्षपदी निवड आणि देशभरातले दौरे पाहता तेच मोदींचा सामना करणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, October 8, 2013 - 14:10
comments powered by Disqus