खाते उघडल्यावर मिळणार पैसे, अफवेमुळे बँकेबाहेर रांगा

 राजस्थानमध्ये अनेक शहरांमध्ये सरकार पैसे वाटत असल्याची अफवा पसरल्याने जयपूरसह अनेक मोठ्या शहरांमध्ये बँकाबाहेर लांबच लांब रांगा लागल्या. कोटामध्ये तर परिस्थिती इतर बिघडली की पोलिसांना पाचारण करावे लागले.

Updated: Aug 28, 2014, 08:22 AM IST
खाते उघडल्यावर मिळणार पैसे, अफवेमुळे बँकेबाहेर रांगा

जयपूर :  राजस्थानमध्ये अनेक शहरांमध्ये सरकार पैसे वाटत असल्याची अफवा पसरल्याने जयपूरसह अनेक मोठ्या शहरांमध्ये बँकाबाहेर लांबच लांब रांगा लागल्या. कोटामध्ये तर परिस्थिती इतर बिघडली की पोलिसांना पाचारण करावे लागले.

नागरिक बँकेत खाते उघडल्यानंतर पैशाची मागणी करू लागले. अफवेमुळे बँकांच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या. दरम्यान, खाते कधी उघडायचे आहे, या संदर्भात केंद्र सरकारकडून अजूनही बँकांना सूचना पाठविण्यात आल्या नाहीत. पंतप्रधान जनधन योजनेचा प्रचार करताना नागरिकांना बँकेत जाऊन खाते उघडण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे अनेक जण आपले बँकेत खाते असले तरी बँकेत खाते उघडण्याचा अर्ज घेऊन बँकेत गर्दी करत आहेत. गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी बँकेतील कर्मचारी अर्ज स्वीकारत आहेत.

जयपूरच्या एका बँक अधिकाऱ्याने सांगितले, समजत नाही की बँकेत खाते उघडल्यावर पैसे मिळणार ही कोणी अफवा पसरवली. नागरिकांनी बँकांच्या बाहेर रांगा लावल्या आहेत. आम्ही अनेकांना सांगितले, पण ज्यांचे खाते आहे तेही या रांगेत उभे आहेत.
७० वर्षीय नुरा बानो सकाळी सकाळी जयपूरच्या पंजाब नॅशनल बँकेच्या बाहेर ठाण मांडू बसल्या आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, पैसे मिळणार तेव्हाच त्या घरी जातील. त्यांच्या गल्लीत कोणी तरी अफवा पसरवली की वर्तमानपत्र, रेडिओ, टीव्ही प्रत्येक ठिकाणी बातमी आली की सरकार बँकेत खाते उघडल्यावर पैसे देणार त्यामुळे लोकांनी गर्दी केली आहे.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.