भीक न दिल्याने भिकाऱ्याने प्रवाशाला घेऊन रेल्वे ट्रकवर घेतली उडी...

 औरैयाच्या फफुंद रेल्वे स्टेशनवर भीक न दिली म्हणून नाराज झालेल्या भिकाऱ्याने एका प्रवाशाला जबसदस्ती पकडून राजधानी एक्स्प्रेससमोर उडी घेतली. या विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू झाला. 

Updated: Oct 14, 2015, 12:18 PM IST
भीक न दिल्याने भिकाऱ्याने प्रवाशाला घेऊन रेल्वे ट्रकवर घेतली उडी... title=

लखनऊ :  औरैयाच्या फफुंद रेल्वे स्टेशनवर भीक न दिली म्हणून नाराज झालेल्या भिकाऱ्याने एका प्रवाशाला जबसदस्ती पकडून राजधानी एक्स्प्रेससमोर उडी घेतली. या विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू झाला. 

या घटनेनंतर स्टेशन परिसरात खळबळ उडाली. या घटनेत सर्वेश कुमार हा लालपूरचा प्रवासी मृत्यूमुखी पडला. तो आपल्या बहिणीच्या घऱी तेराव्याला आला होता. रात्री आपल्या काकासोबत घरी जात होता. 

त्यावेळी १०.३० सुमारा. प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर बसला होता. त्यावेळी २५ वर्षीय तरूण त्या ठिकाणी आला. त्याने सर्वेशकडून १०० रुपये मागितले. सर्वेशने पैसे देण्यास नकार दिला. नकार दिल्यानंतर तरूण त्या ठिकणीच घिरट्या मारत होता. काही वेळानंतर कानपूर जाणारी राजधानी एक्स्प्रेस येत होती त्यावेळी त्या माथेफिरू तरूणाने सर्वेशला पकडले आणि कोणालाही काही समजण्यापूर्वी ट्रेनसमोर उडी घेतली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला. भीक मारणारा तरूणी मानसिकदृष्टया विक्षिप्त होता. त्याच्याकडे काही कागदपत्र सापडले, तो झारखंडचा राहणारा आहे. 

एका दुसऱ्या घटनेत फफूंद स्टेशनवर आणखी एका युवकाने राजधानी खाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा मृत्यू झाला नाही. राजधानी एक्स्प्रेस त्याच्या अंगावरून गेली. लोकांनी हा प्रकार पाहिला. तो रेल्वे रूळांखाली झोपून राहिला होता. रेल्वे गेल्यावर त्या मुलाला विश्वास बसला नाही 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.