‘मी राहुल गांधींची प्रेयसी... त्यांनी मला फसवलं’

 ‘मी राहुल गांधी यांची प्रेयसी आहे’ असं म्हणणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणीनं आग्रा पोलिसांची झोपच उडवली...

Updated: Nov 21, 2014, 09:01 PM IST
‘मी राहुल गांधींची प्रेयसी... त्यांनी मला फसवलं’ title=

आग्रा :  ‘मी राहुल गांधी यांची प्रेयसी आहे’ असं म्हणणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणीनं आग्रा पोलिसांची झोपच उडवली...

गुरुवारी दुपारी ही २३ वर्षीय तरुणी आग्रा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली आणि आपली कैफियत तीनं पोलिसांसमोर मांडली. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्याला फसवलंय... गेल्या चार वर्षांपासून त्यांनी आपल्याला भेटण्यासाठी वेळही दिला नाहीय, अशी तक्रार तिनं पोलिसांकडे केली... यामुळे, पोलीसही चांगलेच बुचकळ्यात पडले...
अधिक विचारणा केली असता... आपल्याला राहुल गांधी लहानपणापासूनच खूप आवडतात.... पण, आपली होणारी सासू म्हणजेच सोनिया गांधी या खूपच वाईट आहेत, असं तिनं पोलिसांना सांगितलं.

या तरुणीचे वडील नायब सुभेदार आहेत. तिचं शालेय शिक्षण पूर्ण झालंय. आपले काका रेल्वे बोर्डात जनरल सेक्रेटरी होते, त्यांची गांधी कुटुंबीयांशी चांगली ओळख होती. त्यांनीच राहुलची आणि आपली ओळख करून दिली... असंही तिनं म्हटलं. इंदिराजींनीच ही सोयरिक त्यांच्या लहानपणी ठरवल्याचा दावाही तिनं केला. 

पण, गेले चार वर्ष ती राहुल गांधीना भेटण्याचा प्रयत्न करतीये, पण तिला भेटू दिलं जात नाही... आत्तापर्यंत केवळ दोनदा आपली आणि राहुलची भेट झाल्याचंही तिनं म्हटलं... पहिली भेट ही चार वर्षांपूर्वी दिल्लीच्या कालकाजी मंदीरात झाली होती. राहुल इथं दर्शनासाठी आले होते... तर, दुसरी भेट ही हल्लीच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान झाली. यावेळी, रामपूरच्या सभेत राहुल भाषण देत होते तेव्हा त्यांनी संपूर्ण भाषण हे आपल्याकडे बघून केल्याचा दावाही या तरुणीनं केला.

राहुल आपल्याला ओळखतात... त्यांनी आपल्यासाठी सर्चिँग सेटलाइट लावलेत... आपल्या क्षणाक्षणाची खबर त्यांना असते... असंही या तरुणीनं पोलिसांना सांगितलं. त्यामुळे, पोलीस चांगलेच बुचकळ्यात पडले.

पण, काही वेळाने तिचा भाऊ इथं पोहचला आणि पोलिसांची सुटका झाली... आपली बहीण मनोरुग्ण असून तिच्यावर सध्या उपचार सुरू असल्याचंही तिच्या भावानं पोलिसांना सांगितलं... त्यानंतर पोलिसांनी या युवतीला तिच्या भावाच्या स्वाधीन केलं... आणि मोकळा श्वास घेतला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.