मॅगी बंदी: आरोग्यमंत्र्यांनी बोलवली बैठक, उत्तराखंडमध्येही मॅगीवर बंदी

केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी मॅगीच्या वादावर चर्चेसाठी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी बोलावलेल्या या बैठकीत अनेक वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. 

Updated: Jun 4, 2015, 03:00 PM IST
मॅगी बंदी: आरोग्यमंत्र्यांनी बोलवली बैठक, उत्तराखंडमध्येही मॅगीवर बंदी  title=

नवी दिल्ली: केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी मॅगीच्या वादावर चर्चेसाठी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी बोलावलेल्या या बैठकीत अनेक वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. केंद्र सरकारनं या मुद्द्यावर सर्व राज्यांकडून अहवाल मागविला आहे. सर्व राज्यांकडून अहवाल प्राप्त झाल्यावरच या बाबतीत योग्य ती कारवाई केली जाईल, असं जे. पी. नड्डा यांनी बुधवारी बैठकीपूर्वी स्पष्ट केलं.

मॅगी बंदी प्रकरणी आतापर्यंतच्या घडामोडी -

- राजस्थानमधील अजमेरमध्ये मॅगी वर बंदी
- अजमेरमधून २२४९ किलो मॅगी जप्त
- उत्तराखंडमध्ये मॅगीवर बंदी
- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांकडून अहवाल मागविले.
- अन्न व औषध प्रशासन आज आपला अहवाल प्रधानमंत्री कार्यालयाला सोपवणार आहे.  

दरम्यान, लष्करानं बुधवारी आपल्या जवानांना मॅगी नूडल्स न खाण्याचे निर्देश जारी केले आहेत. पुढील आदेशापर्यंत लष्कराच्या कॅन्टीनमध्ये मॅगी नूडल्स बनणार नाही, असे निर्देशही लष्करानं दिले. मॅगी हे जवानांमधील लोकप्रिय ‘स्नॅक्स’ आहे. मात्र लष्कराच्या या आदेशानंतर सुमारे एक हजार लष्करी कॅन्टीनमध्ये आता मॅगी बनणार नाही. हा नेस्लेसाठी फार मोठा धक्का मानला जात आहे.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.