महाराष्ट्र एकच नंबर : चित्ररथाला प्रथम पारितोषिक

राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सादर झालेल्या महाराष्ट्राच्या राज्याच्या चित्ररथाला प्रथम पारितोषिक जाहीर झालंय. 

Updated: Jan 29, 2015, 07:39 PM IST
महाराष्ट्र एकच नंबर : चित्ररथाला प्रथम पारितोषिक title=

नवी दिल्ली : राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सादर झालेल्या महाराष्ट्राच्या राज्याच्या चित्ररथाला प्रथम पारितोषिक जाहीर झालंय. 

यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही या चित्ररथ उभारण्यासाठी हातभार लावणाऱ्या सर्व कलावंतांचं अभिनंदन केलंय. 

महाराष्ट्र राज्यातर्फे यावर्षी पंढरीची वारी सादर करण्यात आली होती. अजय अतुल यांच्या विठ्ठल विठ्ठल या सुंदर गाण्याची पार्श्वभूमी त्याला होती. या चित्ररथाच्या माध्यमातून राजपथावर साक्षात आनंदवारी साकारली होती. 

महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रेक्षकांचाही तुफान प्रतिसाद मिळाला होता. विशेष म्हणजे, महाराष्ट्राच्या चित्ररथाला आता प्रथम पारितोषिक मिळालंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.