मोदी मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. उत्तरेतल्या भाजपच्या राज्यातील मुख्यमंत्र्यांना दिल्लीत आणले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 15, 2017, 12:07 PM IST
मोदी मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता title=

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. उत्तरेतल्या भाजपच्या राज्यातील मुख्यमंत्र्यांना दिल्लीत आणले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

आता राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजेंची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वसुंधरा राजे यांच्या जागी ओम माथूर यांना राजस्थानात मुख्यमंत्री म्हणून पाठवलं जाण्याची चिन्हं आहेत. 

वसुंधराराजे या अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्री होत्या.  येत्या 12 एप्रिलला संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशऩ संपणार आहे. त्यानंतर लगेचच मोदी मंत्रिमंडळात फेरबदल करतील अशी शक्यता आहे.