व्हिडिओ : दगड मारणाऱ्यांना का बांधावं लागलं जीपला, सांगतायत मेजर गोगोई

वादात सापडलेल्या भारतीय लष्काराचे मेजर लीतुल गोगोई मंगळवारी मीडियासमोर हजर झाले. गेल्या महिन्यात दगडफेक करणाऱ्यांपासून स्वत:ला आणि आपल्या जवानांना वाचवण्यासाठी आपल्याला एका दगडफेकणाऱ्यांपैंकी एका व्यक्तीला व्यक्तीला जीपला बांधावं लागलं असं त्यांनी म्हटलं... यावेळी घटनास्थळी काय परिस्थिती होती, ती परिस्थितीदेखील त्यांनी कथन केलीय. 

Updated: May 24, 2017, 08:57 AM IST
व्हिडिओ : दगड मारणाऱ्यांना का बांधावं लागलं जीपला, सांगतायत मेजर गोगोई title=

श्रीनगर : वादात सापडलेल्या भारतीय लष्काराचे मेजर लीतुल गोगोई मंगळवारी मीडियासमोर हजर झाले. गेल्या महिन्यात दगडफेक करणाऱ्यांपासून स्वत:ला आणि आपल्या जवानांना वाचवण्यासाठी आपल्याला एका दगडफेकणाऱ्यांपैंकी एका व्यक्तीला व्यक्तीला जीपला बांधावं लागलं असं त्यांनी म्हटलं... यावेळी घटनास्थळी काय परिस्थिती होती, ती परिस्थितीदेखील त्यांनी कथन केलीय. 

दगडफेक करणाऱ्यांपासून वाचण्यासाठी त्यांच्यापैंकीच एका व्यक्तीला आपल्या जीपच्या पुढे बोनटला बांधून जातानाचा लष्कराचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावर ते बोलत होते. या 'मानवी कवचा'च्या साहाय्यानं लष्कराला आपला बचाव करावा लागल्याचं मेजर गोगोई यांनी राष्ट्रीय टीव्हीसमोर येऊन सांगितलंय. 

एखाद्या मेजर रँकच्या अधिकाऱ्याला मीडियासमोर येऊन आपली भूमिका मांडण्याची संधी क्वचितच मिळते... सरकारनंही गोगोई यांचा बचाव केलाय. केंद्रीय मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनीदेखील 'अपवादात्मक परिस्थितीत' गोगोईंनी अनेकांचा जीव वाचवल्याचं म्हटलंय. मेजर गोगाई यांचा भारतीय लष्कराकडून सन्मानही करण्यात आलाय. गोगाई यांना दहशतवादविरोधी कारवाईसाठी चीफ ऑफ आर्मी स्टाफ कॉमन्डेशन (COAS) ने सन्मानित करण्यात आलं.