मित्राच्या पत्नीवर बलात्कार, काढला व्हिडिओ

By Prashant Jadhav | Last Updated: Tuesday, December 24, 2013 - 19:55

www.24taas.com, झी मीडिया, भोपाळ
एका तरुणाने आपल्या मित्राच्या पत्नीच्या कोल्डड्रिंक्समध्ये नशेचे औषध मिसळून बलात्कार केला आणि तिचा व्हिडिओ बनविला. महिलेच्या तक्रारीनंतर तरुणाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.
गेल्या चार ऑगस्टमध्ये महिला आपल्या पतीशी घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात गेली असता पतीच्या एका मित्राने तिला लवकरात लवकर घटस्फोट घेऊन देतो, असे सांगून तिला आपल्या कारमध्ये बसवले तेव्हा ही घटना घडली.
पतीच्या मित्राने चिनार पार्क येथे नेऊन महिलेला कोल्डड्रिंक्समध्य़े नशेचे औषध दिले. ती बेशुद्ध पडल्यावर त्याच ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला आणि व्हिडिओ बनवला. त्यानंतर व्हिडिओला सार्वजनिक करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल केले आणि २ लाख रुपयेही वसूल केले. सततच्या त्रासला कंटाळलेल्या महिलेने अखेर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली.
२६ वर्षीय या महिलेला तिच्या पतीचा मित्र नवीन शर्मा याने फसवले आणि फसवून बलात्कार केला आणि व्हिडिओ काढल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर नवीनने महिलेच्या घरात एक खोली भाड्याने घेतली आणि तिचा वारंवार बलात्कार केला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, December 24, 2013 - 19:55
comments powered by Disqus