मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांवर गोळीबार, एक पोलीस जखमी

सोमवारी सकाळी बॉम्बस्फोटची बातमी आल्यानंतर माहिती आली की, मणिपूरचे मुख्यमंत्री इबोबी सिंह यांचं विमान जेथे लँड झालं तेथे हॅलिपॅडजवळ गोळीबार झाला. मुख्यमंत्री विमानातून उतरतांना ही घटना घडली. मुख्यमंत्री सुरक्षित असल्याची माहिती आहे पण या हल्ल्यात एक पोलीस अधिकारी जखमी झाला आहे.

Updated: Oct 24, 2016, 04:48 PM IST
मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांवर गोळीबार, एक पोलीस जखमी title=

उखरूल : सोमवारी सकाळी बॉम्बस्फोटची बातमी आल्यानंतर माहिती आली की, मणिपूरचे मुख्यमंत्री इबोबी सिंह यांचं विमान जेथे लँड झालं तेथे हॅलिपॅडजवळ गोळीबार झाला. मुख्यमंत्री विमानातून उतरतांना ही घटना घडली. मुख्यमंत्री सुरक्षित असल्याची माहिती आहे पण या हल्ल्यात एक पोलीस अधिकारी जखमी झाला आहे.

नॅशनल सोशलिस्ट काउंसिल ऑफ नागालंडच्या माओवाद्यांना यामागे हात असल्याचा अंदाज आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी उखरूलमध्ये बॉम्बलास्ट झाला. या हल्ल्यातही एक जण जखमी झाला आहे.

रविवार उखरूलच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या घराजवळ एक हँड ग्रेनेड सापडलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्याला निष्क्रिय करण्यात आलं.