‘सिंग इज किंग’, पंतप्रधान ठरले अव्वल ‘सिंग’!

जगातील सर्वात शक्तीशाली आणि प्रभावशाली शीख म्हणून पंतप्रधान मनमोहन सिंग अव्वल नंबरवर आहेत. ‘शीख १००’ या मासिकानं जगातील सर्वात शक्तीशाली आणि प्रभावशाली शीख असल्याचं म्हटलंय.

Aparna Deshpande | Updated: Nov 10, 2013, 08:30 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, लंडन
जगातील सर्वात शक्तीशाली आणि प्रभावशाली शीख म्हणून पंतप्रधान मनमोहन सिंग अव्वल नंबरवर आहेत. ‘शीख १००’ या मासिकानं जगातील सर्वात शक्तीशाली आणि प्रभावशाली शीख असल्याचं म्हटलंय.
जगभरातील शीखांच्या प्रगतीचा आढावा घेणाऱ्या ‘शीख १००’ या मासिकानं जगभरातील १०० प्रभावशाली शीख व्यक्तींची यादी तयार केली आहे. या यादीमध्ये पंतप्रधानांनी अव्वल स्थान पटकावलंय. मनमोहन सिंग हे एक नावजलेले विचारवंत आणि हुशार व्यक्तीमत्व असल्याचं मासिकात म्हटलंय.
पंतप्रधानांच्या खालोखाल नियोजन आयोगाचे मॉन्टेक सिंग अहलुवालिया यांना सर्वात प्रभावशाली व्यक्तीमत्वाच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत. अमृतसर इथल्या अकाली तख्त साहिबचे प्रमुख जथेदर सिंग साहिबा गणी गुरुबच्चन सिंग यांना तिसरं स्थान तर पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांना चौथं स्थान देण्यात आलंय.
अमेरिकेतल्या मास्टरकार्ड वर्ल्डवाईडचे अध्यक्ष आणि सीईओ अजयपाल सिंग बंगा हे आठव्या तर ब्रिटनमधील रॉयल कोर्ट ऑफ जस्टिसच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश रजबिंदर सिंग हे या यादीत नवव्या स्थानावर आहे.
पंतप्रधान मनमोहन सिंग याची पत्नी गुरशरन कौर या १३व्या तर शिरोमणी अकालीदलाचे अध्यक्ष आणि पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबिर सिंग बादल १४व्या स्थानी आहेत.
विरोधकांकडून अनेकदा हिणवलं गेलेलं असतानाही पंतप्रधान म्हणून मनमोहनसिंग यांची कारकीर्द मासिकानं मोठी ठरवलीय. आपल्या पहिल्याच आवृत्तीमध्ये `शीख १००` या मासिकानं त्यांना मानाचं स्थान दिलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.