मी वाकडा विचार देखील करु शकतो- संरक्षणमंत्र्यांचा पाकिस्तानला इशारा

सर्जिकल स्ट्राईकनंतर संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचा आज सन्मान करण्यात आला. यादरम्यान मनोहर पर्रिकर यांनी म्हटलं की, लोकं असा विचार करतात की संरक्षण मंत्री खूप साधे आहेत पण जेव्हा देशाची गोष्ट येते तेव्हा मी वाकडा देखील विचार करु शकतो. सोबतच त्यांनी भारतीय जवानांचं देखील कौतूक केलं.

Updated: Oct 6, 2016, 03:53 PM IST
मी वाकडा विचार देखील करु शकतो- संरक्षणमंत्र्यांचा पाकिस्तानला इशारा title=

आग्रा : सर्जिकल स्ट्राईकनंतर संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचा आज सन्मान करण्यात आला. यादरम्यान मनोहर पर्रिकर यांनी म्हटलं की, लोकं असा विचार करतात की संरक्षण मंत्री खूप साधे आहेत पण जेव्हा देशाची गोष्ट येते तेव्हा मी वाकडा देखील विचार करु शकतो. सोबतच त्यांनी भारतीय जवानांचं देखील कौतूक केलं.

सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवरही त्यांनी टीका केली. जे लोकं सेनेच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित करतात ते इमानदार नाही. मी सैनिकांना नेहमी सांगतो की तुम्ही शहीद नका होऊ तर दहशतवाद्यांना ठार करा.त त्यामुळे देशाचा अधिक फायदा होईल. सर्जिकल स्ट्राईक १०० टक्के यशस्वी राहिलं. मोदींच्या राज्यात देशाच्या सीमा सुरक्षित आहेत. जे भारतीय सेनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात अशा लोकांपासून सुरक्षित राहण्याचं गरजेचं आहे.

भाजप नेत्यांनी म्हटलं की, आता ती वेळ गेली की पाकिस्तान आमच्या सैनिकांचं शीर वेगळं करेल. मोदींच्या ५६ इंचच्या छातीचा देखील मंचावरुन अनेकदा उल्लेख झाला. पाकिस्तान आताही जर नाही सुधरला तर त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील.